Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

तरुण क्रिकेटपटूंना रोहित शर्मा करणार मार्गदर्शन

Image


नवी दिल्ली वृत्तसंस्था : महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात खेळत नसताना, मर्यादीत षटकांच्या सामन्यात उप-कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी येणार आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपले कतृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे रोहितने संघातील तरुण खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली करत आहेत.

मैदानात काहीवेळा झटपट निर्णय घेण्याची आवश्यकता असते. रोहितने अशावेळी तरुण खेळाडूंशी बोलून, चर्चा करून त्यांना मदत करावी अशी अपेक्षा आहे. संघामध्ये तुम्हाला समतोल राखायचा असतो. कर्णधाराला मदतीसाठी एका सीनिअर खेळाडूची गरज असते. धोनी संघात असताना कोहली आणि धोनी हे तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करायचे. सध्या धोनी भारतीय संघात नसल्यामुळे रोहितने आपल्या अनुभवाचा फायदा संघातील तरुण खेळाडूंना करून द्यावा, असे सर्वाचे मत आहे, असे संघ व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले.


रोहितने याआधी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तो पहिल्यांदा खेळाडूंना मार्गदर्शन करतोय अशातला भाग नाही. कर्णधार आणि प्रशिक्षकांचा रोहितच्या अनुभवावर विश्वास आहे, त्यामुळे रोहितसारख्या अनुभवी खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाविरोधात गोलंदाजांना मार्गदर्शन करणे, हे केव्हाही संघासाठी फायदेशीर ठ डिग्री शकते, असेही सूत्रांनी सांगितले.


Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh