Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

रवी शास्त्री टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम?

Image
नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा आगामी प्रशिक्षक कोण असणार, याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. पण टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री हेच कायम राहणार असल्याचे वृत्त पुढे येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. बीसीसीआयची सल्लागार समिती शास्त्री यांच्याकडेच प्रशिक्षकपदाची धुरा सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयच्या वतीने अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्याशिवाय माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता गंतास्वामी आहेत. त्रिसदस्यीय समितीने, भारतीय संघासाठी प्रशिक्षक म्हणून परदेशी उमेदवाराऐवजी भारतीय उमेदवारालाच पसंती दिली जाईल, असे सूचक विधान केले आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यातला ताळमेळ पाहता, प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीच पुनरागमन करतील, असे चित्र निर्माण झाले आहे.


सध्याच्या घडीला भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका खेळत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ विंडीज दौ-यानंतर संपणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये बीसीसीआयची सल्लागार समिती प्रशिक्षकपदाबाबतचा निर्णय घेणार आहे. सल्लागार समितीने प्रशिक्षकपदाची निवड करण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीबरोबर चर्चा केली आहे. या चर्चेमध्ये विराटने शास्त्री यांनाच प्रशिक्षकपदी कायम ठेवावे, असे सांगितल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सल्लागार समितीने कोहलीच्या मताचा मान ठेवला असून, शास्त्री यांच्याच गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ कायम राहील, असे म्हटले जात आहे.

कपिल देव यांच्या समितीने प्रशिक्षकांच्या पदाचे अर्ज पडताळण्यास सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही समिती रवी शास्त्री यांच्या कामावर खूश आहे. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून पुन्हा शास्त्री यांची नियुक्ती होऊ शकते. तसेच, १५ ऑगस्टच्या आसपास टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळू शकतो.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मुडी आहेत. त्यांनी २००७च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेला अंतिम फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर २०१२पासून टॉम मुडी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. तसेच, न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसन याने अर्ज दाखल केला होता. २०१५च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

कोचिंग स्टाफचा कार्यकाळ
सध्या कार्यरत असलेल्या भारताच्या कोचिंग स्टाफचा कार्यकाळ हा वेस्ट इंडिज दो-यापर्यंत म्हणजेच ४५ दिवस वाढवण्यात आला आहे. यात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा समावेश आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh