Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Image


मुंबई प्रतिनिधी : मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. सन 2018-19 या वर्षासाठीच्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2018-19 चे जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील पुरस्कारासाठी प्राप्त क्रीडा व खेळ प्रकारातील उत्कृष्ट क्रीडापटू (एक पुरुष/एक महिला खेळाडू व एक दिव्यांग खेळाडू), गुणवंत मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांनी विहित नमुन्यातील अर्ज भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, 2 रा मजला, सायन-बांद्रा लिंक रोड, धारावी बस डेपो शेजारी, धारावी, सायन (प), मुंबई-400 017 येथून विनामुल्य प्राप्त करुन घेता येणार आहेत.

सदर पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्याबाबतचे आवाहन यापूर्वीही करण्यात आले आहे. सदर पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 15 जुलै 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर (दुरध्वनी क्र.022-65532373) येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे कळविले आहे.

क्रीडासंकूलाचा आढावा घेऊन विकासाचा सर्वंकष अहवाल सादर करा : मुनगंटीवार

राज्यात क्रीडा कौशल्ये असलेल्या युवक- युवतींची कमी नाही, गरज आहे त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची. त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत असून क्रीडा विभागाने राज्यातील सर्व क्रीडा संकुलांचा आढावा घेऊन त्यांच्या सर्वंकष विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा आणि निधीची माहिती देणारा अहवाल सादर करावा, अशा सूचना वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या

मुनगंटीवार म्हणाले, असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर साधारणत: तीन ते चार वर्षात आपण ही सर्व क्रीडा संकुले टप्प्या टप्प्याने अद्ययावत करू. सर्वांसाठी खेळाद्वारे सुदृढता आणणे, आरोग्यसंपन्न जीवनाला चालना देणे अत्यंत गरजेचे आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके प्राप्त करावीत, यासाठी आठ खेळांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याकरिता विशेष धोरण राबविण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून १५० कोटी रुपये चालू वर्षात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात करोडी येथे राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे, वाळुंज, ता. गंगापूर जि. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण तयार करण्याचाही शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने विभागाने स्तरावर पाऊले उचलावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

क्रीडा संकुलाचे काम देतांना वर्कऑर्डरमध्येच त्या कामाच्या पुर्ततेचा दिनांक टाकला जावा, दिलेल्या मर्यादेत काम पूर्ण होत आहे की नाही याकडे लक्ष दिले जावे असेही ते म्हणाले. मुनगंटीवार यांनी मिशन शौर्य आणि मिशन शक्तीचा आवर्जुन उल्लेख केला. आदिवासी विद्यार्थ्यांनी जे कधी विमानात देखील बसले नव्हते त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर कठोर परिश्रमातून एव्हरेस्ट सर केला, भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने तिथे फडकवला. असे अनेक गुणवत्ताधारक खेळाडू आपल्याकडे आहेत. विविध क्षेत्रातील या खेळांडूसाठी सोयी-सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास २०२४ च्या आलिंपिकमध्ये भारत नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवू शकेल. त्यादृष्टीने विभागाने परिपूर्ण नियोजन करावे अशा सूचना ही त्यांनी दिल्या.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh