Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

200हून अधिक देशांमध्ये झळकणार वर्ल्ड कप, भारतात सात भाषांमध्ये होणार प्रसारण

Image



नवी दिल्ली वृत्तसंस्था - आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांना इंग्लंडमधील वर्ल्ड कप स्पर्धा पाहता यावी, यासाठी आयसीसीने मंगळवारी प्रसारण आणि डिजिटल वितरण योजनेची घोषणा केली. यानुसार, पहिल्यांदाच अफगानिस्तानमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रसारण होणार आहे. या योजनेनुसार क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी टीव्ही, रेडिओ आणि डिजिटल माध्यमांशिवाय बातम्या, सिनेमा, फॅन पार्क आणि विविध मीडियाच्या भागिदारांची घोषणा आयसीसीने केली आहे.


पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2019 चे जागतिक प्रसारण स्टार स्पोर्ट्सशिवाय 20 अन्य भागिदारांसोबत केले आहे. यानुसार 200 हून अधिक देशांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेचे प्रसारण करण्यात येणार आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धेचे भारतातील सात प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे.

भारतात स्टार स्पोर्ट्स इंग्रजीशिवाय हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, बांगला आणि मराठी या भाषांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रसारण करणार आहे. यामध्ये 12 सामन्यांचे एशियानेट प्लसच्या माध्यमातून मल्याळी भाषेत सुद्धा प्रसारण केले जाणार आहे. यासाठी स्टार स्पोर्ट्सने जगभरातील प्रसिद्ध समालोचकांची टीम तयार केली आहे. यामध्ये जळपास 50 समालोचकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच अफगाणिस्तामध्ये क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रसारण होणार आहे. अफगाणिस्तामधील सरकारी रेडिओ, टीव्ही याचे प्रसारण करणार आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh