Breaking news
23-07-2018 : 12:08:51

काँग्रेसकडून निवडणुकीचे बिगूल ; राहुल गांधींकडे महाआघाडीचे सर्वाधिकार

23-07-2018 : 12:07:44

पंढरपुरात जाधव दाम्पत्याकडून पूजा; मुख्यमंत्र्यांची मुंबईत विठ्ठलपूजा

22-07-2018 : 11:12:18

शंभर गिरीप्रेमींची कळसूबाई शिखरावर चढाई

22-07-2018 : 11:07:46

नितीश कुमारांचं दलितांना पदोन्नतीत आरक्षण

22-07-2018 : 10:59:29

तिरस्काराला प्रेम आणि आपुलकी हेच उत्तर- राहुल गांधी

22-07-2018 : 10:56:08

जीएसटी: १०० वस्तू स्वस्त, "या" वस्तू करमुक्त

21-07-2018 : 11:00:07

आषाढी यात्रेसाठी धावणार १९० जादा बसगाड्या

21-07-2018 : 10:59:40

हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार

17-07-2018 : 10:30:17

महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

17-07-2018 : 10:29:51

शिवरायांच्या आजोबांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्कमध्ये

13-07-2018 : 05:53:28

डेकोरेटर्सना धक्का; थर्माकोल बंदीवर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब

12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारतच अव्वल

Image


दिल्ली वृत्तसंस्था : आयसीसी कसोटी गदा सलग तिस-या वर्षी कायम राखताना भारताने पारंपरिक क्रिकेट प्रकारात अव्वल नंबर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. आयसीसी रँकिंगमध्ये भारताने ११६ रेटिंग गुणांसह अव्वल स्थान राखले आहे.

वार्षिक क्रमवारीची ‘कट ऑफ डेट’ १ एप्रिल असते. ताज्या क्रमवारीमध्ये भारताचे पहिले स्थान कायम आहे. वर्षअखेर अव्वल स्थान पटकावणा-या संघाला मानाची गदा प्रदान केली जाते. गदेसह १० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस भारताने मिळवले.

यंदाच्या मोसमात भारताची कसोटीतील कामगिरी चांगलीच बहारली. घरच्या मैदानावर एकमेव कसोटीमध्ये कमकुवत अफगाणिस्तानला हरवले. त्यानंतर वेस्ट इंडिजवर २-० अशी मात केली. परदेशातील कामगिरी संमिश्र राहिली. इंग्लंडमध्ये १-४ असा नामुष्कीजनक पराभव पाहावा लागला तरी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याचा भीमपराक्रम भारताने विराट कोहली आणि सहका-यांनी केला. वर्षाच्या सुरुवातीला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला.

आयसीसी वार्षिक क्रमवारीमध्ये केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने दुसरा क्रमांक मिळवला. त्यांच्या खात्यात १०८ गुण आहेत. अव्वल पाच संघांमध्ये दक्षिण आफ्रिका (१०५ गुण, तिसरा), ऑस्ट्रेलिया (१०४, चौथा) आणि इंग्लंड (१०४, पाचवा) संघांचा समावेश आहे. दुस-या क्रमांकावरील संघाला पाच लाख डॉलर, तिस-या क्रमांकावरील संघाला दोन लाख डॉलर तसेच ऑस्ट्रेलिया संघाला एक लाख डॉलरचे बक्षीस मिळेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे समसमान गुण आहेत. मात्र सरस गुणफरकाच्या आधारे ऑस्ट्रेलिया संघ चौथ्या स्थानी स्थिरावला.

ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजय निर्णायक
यंदाच्या मोसमात भारताची कसोटीतील कामगिरी चांगलीच बहारली. घरच्या मैदानावर एकमेव कसोटीमध्ये कमकुवत अफगाणिस्तानला हरवले. त्यानंतर वेस्ट इंडिजवर २-० अशी मात केली. परदेशातील कामगिरी संमिश्र राहिली. इंग्लंडमध्ये १-४ असा नामुष्कीजनक पराभव पाहावा लागला तरी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याचा भीमपराक्रम भारताने विराट कोहली आणि सहका-यांनी केला. वर्षाच्या सुरुवातीला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला.

आता उत्सुकता जागतिक कसोटी जेतेपदाची
पारंपरिक कसोटी क्रिकेट टिकून राहावे, या उद्देशाने आयसीसीने या वर्षापासून आयसीसी कसोटी स्पर्धा खेळवण्याचे ठरवले आहे. त्यात कसोटी खेळणारे नऊ देश आपापसांमध्ये भिडतील. त्यांच्यामध्ये २७ मालिका होतील. त्यात ७१ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. अंतिम लढत २०२१ मध्ये होईल.

सांघिक कामगिरीला श्रेय
आयसीसी कसोटी गदा सलग तिस-या वेळी जिंकण्याचा मोठा आनंद आहे. सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल मला सहका-यांचा अभिमान वाटतो. आम्हाला कसोटी क्रिकेटचे महत्त्व ठाऊक आहे. आमचा संघ सर्वसमावेशक आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमधील ‘डेप्थ’ आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे वैशिष्टय़ आहे. या वर्षापासून आयसीसी जागतिक कसोटी स्पर्धा होत आहे. क्रमवारीतील सातत्य आम्हाला त्या स्पर्धेत कामगिरी उंचावण्यास मोलाचे ठरेल.
– विराट कोहली
(कर्णधार, भारत)

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh