Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

भारतीय महिलांनी मालिका जिंकली, पण सामना गमावला

Image

हॅमिल्टन : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आधीच दोन सामने ओळीने जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामना शुक्रवारी आठ गड्यांनी गमावला. विक्रमी २०० वा वन-डे खेळणारी कर्णधार मिताली राज हिने क्लीन स्वीपवर भर दिला होता पण प्रारंभी फलंदाजी करणारा भारत १४९ धावांपर्यंतच मर्यादित राहिला. न्यूझीलंडने हे लक्ष्य २९.२ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. मालिकेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्मृती मानधना हिला गौरविण्यात आले.

तिसस्या स्थानावर आलेल्या दीप्ती शर्माने ९० चेंडूत ५२ धावा केल्या. भारताच्या ३५ षटकात ४ बाद ११७ धावा होत्या, तथापि संपूर्ण संघ ४४ षटकांत १४९ धावांत गारद झाला. सामन्यानंतर मिताली म्हणाली, ‘न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकल्याचा मला आनंद आहे. दीप्ती आणि जेमिमासारख्या खेळाडूंनी धावा केल्या. गोलंदाजांनी देखील संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली.

उभय संघांच्या फलंदाजांसाठी ही खेळपट्टी आव्हानात्मक होती. भारताचा पुरुष संघ देखील ओळीने तीन सामने जिंकल्यानंतर चौथ्या सामन्यात ९२ धावांत गारद झाला होता. न्यूझीलंडकडून अ‍ॅना पीटरसनने दहा षटकात २८ धावांत चार गडी बाद केले. वेगवान लिया ताहूहू हिने तीन बळी घेतले. पहिल्या दोन सामन्यात स्मृती मानधना हिने दमदार कामगिरी केली. हरमनप्रीत हिने ४० चेंडूत २४ धावा केल्या.
न्यूझीलंडकडून सूजी बेट्सने ५७ आणि अ‍ॅमी सेटरवेथ हिने नाबाद ६६ धावा केल्या. तीन सामन्यांची टी-२० मालिका ६ फेब्रुवारीपासून वेलिंग्टन येथे खेळली जाईल.

धावफलक : भारत : जेमीमा रॉड्रिग्ज झे. केर गो. ताहूहू १२, दीप्ती शर्मा झे. पर्किन्स गो. पीटरसन ५२, हरमनप्रीत त्रि.गो. पीटरसन २४, हेमलता झे. बर्नाडाईन गो. केर १३, झुलन नाबाद १२, अवांतर १४, एकूण : ४४ षटकात सर्वबाद १४९. गोलंदाजी : ताहूहू ३-२६, पीटरसन ४-२८, कास्पेरेस १-१८, केर २-४३.
न्यूझीलंड : सूजी बेट्स त्रि. गो. यादव ५७, एमी सेटर्थवेट नाबाद ६६, लॉरेन डाऊन धावबाद १०, सफी डेवाईन नाबाद १७, अवांतर ३, एकूण : २९.२ षटकात २ बाद १५३. गोलंदाजी : यादव १-३१, हेमलता २-०-२२-०.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh