Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत जिल्हयातील एक ही बालक लसीकरणांपासून वंचित राहू नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत

Image
लातूर प्रतिनिधी - मिशन इंद्रधनुष्य -2 हया कार्यक्रमांतर्गत 11 विविध आजारावर प्रतिबंधात्मक लस बालकांना देण्यात येणार आहे. जिल्हयातील 100 टक्के बालकांपर्यंत लसीकरण मोहिम पोहोचवून एक ही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, याकरिता आरोग्य विभागाच्या सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मिशन इंद्रधनुष्य-2 अंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिंमत जाधव,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. कुलदीप शिरपूरकर, डॉ.बरुरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाठक यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की,आरोग्य विभागाने मिशन इंद्रधनुष्य-2 अंतर्गत जिल्हयातील सर्व बालकांचे लसीकरण होईल याची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणेच या माहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी व पर्यवेक्षक यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी डॉ. बरुरे यांनी मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. यामध्ये मिशन अंतर्गत 11 आजारावर प्रतिबंध असलेली लस बालकांना देण्यात येत आहे. यापुर्वी मिशन इंद्रधनुष्य मोहिम देशभरात राबविण्यात आलेली होती. त्यावेळी 60 टक्के बालकांचे लसीकरण झालेले होते. परंतु ही मोहिम 271 जिल्हयात राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील 26 जिल्हयात ही लसीकरण मोहिम राबविली जात आहे. व या अंतर्गत देशभरातील 90 टक्के बालकांचे लसीकरण करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आलेले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मिशन इंद्रधनुष्य-2 ही मोहिम 2 डिसेंबर 2019, 6 जानेवारी 2020, 3 फेब्रुवारी 2020 व 2 मार्च 2020 या चार टप्प्यात राबविण्यात येत आहे.लातूर जिल्हयात आरोग्य विभागाची तयारी झाली असून जिल्हास्तरीय नोडल अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत, असे डॉ. बरुरे यांनी स्पष्ट केले.

डेंग्यू रुग्णांची माहिती :-

जिल्हयातील सर्व खाजगी रुग्णांलयांनी त्यांच्याकडील डेंग्यू, चिकुनगुणिया या आजारांच्या संशयित रुग्णांची माहिती रोजच्या रोज प्रशासनाला दिली पाहीजे. जे रुग्णालय संशयित डेंग्यू रुग्णांची माहिती देणार नाहीत अशा रुणालयांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आरोग्य विभागाच्या विविध बैठकांना उपिस्थत असलेल्या डॉक्टर्स संघटनांचे प्रतिनिधी व खाजगी डॉक्टर्स यांना दिले.

खाजगी रुग्णांलयांनी संशयित डेंग्यू रुग्णांची माहिती रोजच्या रोज दिल्यावर त्या भागात प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविणे प्रशासनाला सोईचे होणार आहे. आरोग्य विभाग व महापालिकेने माहिती न देणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करावी, असे निर्देश ही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.

आयुष्मान भारत :-

आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री आरोग्यदायी योजना राबविली जाते. या अंतर्गत जिल्हयातील 28 टक्के नागरिकाना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आलेले आहे. लातूर जिल्हा हा कार्ड वितरणात राज्यात 8 वा तर मराठवाडा विभागात दुसरा जिल्हा आहे. तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेत लाभ घेणाऱ्या रुग्णांमध्ये मुतखडा, डायलिसीस व कॅन्सर आजारांचे रुग्ण्‍ मोठया प्रमाणावर असल्याची माहिती डॉ. शिरपूरकर यांनी दिली.

स्त्री पुरुष गुणोत्तर :-

लातूर जिल्हयाच्या स्त्री-पुरुष गुणोत्तरात वाढ झाली पाहीजे. याकरीता आरोग्य विभागाने शासकीय व खाजगी रुग्णांलयांमध्ये होणाऱ्या प्रसुतींच्या आकडेवारीचे विश्लेषण करावे. तसेच प्रत्येक खाजगी संस्थांची तपासणी करावी. गरोदर मातांची प्रसुती कोणत्या टप्प्यावर कोठे होत आहे याची माहिती आरोग्य सेविका व आशा वर्कर्समार्फत ठेवावी. ज्या ठिकाणी संशय वाटतो त्या संबंधीत रुग्णालयांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी मिशन इंद्रधनुष्य, जिल्हास्तरीय एड्स नियंत्रण समिती, पीसीपीएनडीटी,राष्ट्रीय मौखीक आरेाग्य कार्यक्रम, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, पुरुष नसबंदी पंधरवाडा,आदि योजना व कार्यक्रमांचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh