Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

शिवलिंगेश्वर फार्मसीमध्ये नुतन प्रवेशित विध्यार्थ्यांचा स्वागत समारोह संपन्न

Imageऔसा (प्रतिनिधी):- तालुक्यातील आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये बी. फार्मसी, फार्म डी. व फार्म डी.(पोस्ट बॅक्युलॅरेट) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या नुतन विद्याथ्र्यांचे व पालकांचे संस्थेच्या वतीने स्वागत करुन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, प्रा. दिनेश गुजराथी, विभाग प्रमुख प्रा.समीर शफी, प्रा. येलम विद्या, प्रा. धुमाळ प्रशांत, प्रा.लोणीकर नितीन, प्रा.लद्दे शिवकुमार इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने करण्यात आली आणि नुतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा चढता आलेख विद्यार्थी व पालकां समोर मांडून शिक्षणाबरोबरच सुसंस्कार, परस्पराविषयी आदरभावना अशा या नैतिक मुल्यांचे शिक्षण विद्याथ्र्यांत रुजविले जातात. प्रा. समीर शफी यांनी फार्मसी क्षेत्राची निवड केल्याबद्दल व या क्षेत्रात असलेल्या विविध करीअर व संधी याबाबत माहिती देऊन शिवलिंगेश्वर कॉलेजची निवड केल्याबद्दल अभिनंदन केले, प्रा. दिनेश गुजराथी व प्रा. सुरज मालपानी यांनी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानतंर शैक्षणिक, संशोधन व औद्यौगीक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या व निर्माण होणा­या संधी, करीअर निवड बाबत सखोल असे मार्गदर्शन केले.

संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांनी संस्थेच्या वतीने बी. फार्मसी, फार्म डी., व फार्म डी. (पोस्ट बॅक्युलॅरेट)कोर्सला प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले. सदरील संस्था ही विद्यार्थी केंद्रबिंदू मानून मागील दीडदक्षकापेक्षा ही अधिक काळापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या अभ्यासक्रमांना संबंध महाराष्ट्रातून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. विद्याथ्र्याचा बौध्दिक, शारीरीक व मानसिक विकास साधण्यासाठी महाविद्यलयात राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील पेपर प्रझेटेंशन, पोस्ट प्रझेंटेंशन व रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर सारखे विविध सामाजीक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. फार्मसीच्या विध्यार्थ्यांना यशस्वी करीअर करावयाचे असेल तर गेट, नाईपर यासारख्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी सदैव तत्पर राहण्याची गरज असल्याचेही नमूद केले. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारासाठी शिक्षण संस्थेच्या ब्राीदवाक्यप्रमाणे कार्य करत आहे. सदरील कार्यक्रमात पालकांमधून झुंबडे वसंत व चिकुर्तीकर अकाश यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुरज मालपाणी यांनी केले तर डॉ. जीवन लव्हांडे यांनी आभार व्यक्त केले असुन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh