Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

गावांच्या विकासाच्या कामी तंत्रज्ञान येणार

Imageऔरंगाबाद प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलविविध विभागांत होणाऱ्या संशोधनाचे फायदे ग्रामीण भागातील नागरिकांना होण्यासाठी विभागांनी एकत्र येऊन एक प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मंजूर करून निधी देण्याची तयारी दर्शविली. यानुसार २ कोटी ६१ लाख ८६ हजार २०९ रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पातून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठात होणार असल्याची माहिती कुलगु डिग्री डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरूंनी देशातील पहिल्यादांच राबविण्यात येत असलेल्या अनोख्या प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी प्रकुलगु डिग्री डॉ. अशोक तेजनकर, समन्वयक डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. भारती गवळी, डॉ. अरविंद धाबे, डॉ. संजय मून, प्रा. कुणाल दत्ता आदींची उपस्थिती होती. कुलगु डिग्री डॉ. चोपडे म्हणाले, केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) कोलकाता येथे झालेल्या बैठकीत विद्यापीठाचा हा प्रस्ताव मंजूर केला. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीच्या युवकांना व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून संबंधित युवक स्वत:च्या बळावर स्वतंत्र व्यवसाय सुरूक डिग्री शकेल. विद्यापीठाचे विविध विभाग यात सहभागी झाले आहेत. संगणक आणि मोबाईलच्या संदर्भातील प्रशिक्षणासाठी संगणकशास्त्र विभाग, मोटारसायकल दुरुस्ती, सौरऊर्जावरील पॅनल बसविणे, वाहन दुरुस्ती, सिंचन व्यवस्था, बॅलेन्सिंग आदी अभ्यासक्रम दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्र आणि औषधी वनस्पती संकलन, औषधी वनस्पतींची शेतीत लागवड व उत्पादन आदींविषयी वनस्पतीशास्त्र विभाग मार्गदर्शन करणार असल्याचेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले. या उपक्रमात सहभागी होणास्या अनुसूचित जाती व जमातीच्या युवकांना शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे. ही योजना या प्रवर्गासाठी असली तरी ग्रामीण भागातील इतर प्रवर्गातील युवकांनाही या उपक्रमात सहभागी होता येईल. त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीत. केवळ त्यांना नियमानुसार शिष्यवृत्ती देता येणार नसल्याचे समन्वयक डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी सांगितले. या उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना केंद्रात होणार आहे. यासाठी डीएसटीचे शास्त्रज्ञ डॉ. देबाप्रिया दत्ता, डॉ. कोनगा गोपीकृष्ण यांची विशेष उपस्थिती असणार, असेही डॉ. शिरसाठ यांनी स्पष्ट केले.
अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी डीएसटीमार्फत मंजूर झालेल्या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ४३ लाख १० हजार १२९ रुपये निधी मिळाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाण, नागद, देवगाव, लोहगाव, अंधानेर व नरसिंगपूर या गावात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ नेमण्यासाठीही निधी देण्यात आला असल्याचे डॉ. शिरसाठ यांनी स्पष्ट केले.Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh