Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

यंदा शाळेची घंटा १७ जूनला वाजणार

Image



मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षांसाठीच्या सुट्ट्यांसंदर्भातील परिपत्रक शिक्षण संचालनालयाने १८ एप्रिल रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षासाठी विदर्भाव्यतिरिक्त राज्यातील शाळा १७ जूनपासून सु डिग्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर २६ जूनपासून सु डिग्री होतील. शाळांना दिवाळीची सुट्टी २१ ऑक्टोबरपासून देण्यात यावी, असे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षात सुट्ट्यांची निश्चिती केली जाते. त्यानुसार संचालनालयाने गुरुवारी सुट्यांचे परिपत्रक जारी केले.

१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करून उन्हाळ्याच्या सुट्या लागू करण्याच्या सूचना द्याव्यात, असे नमूद केले आहे. गणेशोत्सव वा नाताळची सुट्टी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने ठरवण्यात येईल. शाळांना उन्हाळी अथवा दिवाळी या दीर्घ सुट्यांमधून काही सुट्टी गणपती व नाताळसाठी देता येणार आहे. मात्र शाळा संहितेच्या नियमानुसार सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत; तसेच एकूण कामाचे दिवस २३० इतके होतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शासकीय स्तरावरून जाहीर झालेल्या सर्वच सार्वजनिक सुट्या शाळा, ज्युनिअर कॉलेजांनी घेणे बंधनकारक असल्याचेही परित्रकात नमूद आहे. ृ
माध्यमिक शिक्षणाधिकास्यांना सुट्यांच्या निश्चितीबाबत संबंधित मुख्याध्यापक आणि संघटनांची बैठक घेऊन सुट्या निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुट्यांचे वेळापत्रक तयार करताना जून ते मे अखेर असे शैक्षणिक वर्ष विचारात घ्यावे, अशाही सूचना दिल्या आहेत.
शिक्षकेतर कर्मचास्यांच्या सुट्ट्यांबाबत प्रयोगशाळा साहाय्यक आणि परिचर वगळता इतर शिक्षकेतर कर्मचास्यांना दीर्घ सुट्ट्या लागू असणार नसल्याचे म्हटले आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh