Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

डेंटल सर्जरी पदव्युत्तरच्या निवड यादीवर स्थगिती : हायकोर्टाचा आदेश

Imageनागपूर प्रतिनिधी : डेंटल सर्जरी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता तयार करण्यात आलेली पहिली निवड यादी येत्या १० एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात येऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सीईटी सेल व आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना दिला. ही यादी ५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार होती. न्यायालयाच्या स्थगनादेशामुळे ही यादी आता जाहीर करता येणार नाही.
डेंटल सर्जरी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाला (एसईबीसी) आरक्षण देण्यात आले आहे. त्याविरुद्ध डॉ. शिवांगी रघुवंशी व डॉ. प्रांजली चरडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पूर्वलक्षीप्रभावाने लागू करण्यात आलेल्या या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झाला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुके्र व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता पहिली निवड यादी जाहीर करण्यास मनाई केली. तसेच, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, राज्य सीईटी सेल, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना नोटीस बजावून यावर १० एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.
या अभ्यासक्रमासाठी ऑक्टोबर-२०१८ मध्ये प्रवेश परीक्षा झाली. राज्य सरकारने त्यानंतर, म्हणजे ३० नोव्हेंबर २०१८ पासून एसईबीसी कायदा लागू केला. असे असताना डेंटल सर्जरी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील १६ टक्के जागा ‘एसईबीसी’साठी आरक्षित करण्यात आल्या. त्यामुळे कायद्यातील कलम १६ (२) मधील तरतुदीचे उल्लंघन झाले. या तरतुदीनुसार ‘एसईबीसी’ आरक्षण पूर्वलक्षीप्रभावाने लागू करता येत नाही. तसेच, हे आरक्षण घटनाबाह्य आहे असे सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh