Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

विश्वेश्वरय्यास तंत्रशिक्षणामधील देशातील सर्वोच्च एन.बी.ए. व्दारा मानांकन

Image

औसा (प्रतिनिधी) : तालूक्यातील आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचलित विश्वेश्वररय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयास तंत्रशिक्षण क्षेत्रातील देशातील सर्वोच्च दर्जा असलेले एन.बी.ए. चे मानांकन प्राप्त झालेे आहे. विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या अनुषंगाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळानुसार सद्य:स्थितीतील मानांकन प्राप्त असलेल्या पहिल्या 16 तंत्रनिकेतनमध्ये विश्वेश्वरय्याचा समावेश झाला आहे तसेच औरंगाबाद विभागामध्ये तंत्रशिक्षण संचालनालयानुसार एन.बी.ए. नामांकन सद्य:स्थितीत वैध असलेले एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
जगभरातील तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी वॉशिंग्टन येथे जागतीक परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व एन.बी.ए. या संस्थेने केले व त्या संस्थेला 2014 मध्ये जगातील तंत्रशिक्षण परिषदेचे सभासदत्व प्राप्त झाले या अशा आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या एन.बी.ए. या मंडळाने विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयास भारतातील विविध राज्यातील इंजिनीअरिंग क्षेत्रातील अग्रस्थानी असणारी आय.आय.टी. महाविद्यालयात कार्यरत असणा-या तज्ञ मार्गदर्शकाच्या पाच सदस्यीय समितीने तिन दिवसीय भेट देऊन महाविद्यालयाची विद्याथ्र्याकरिता ध्येय आणि उद्दिष्टये, टिचींग-लर्निंग प्रोसेस, विद्याथ्र्यांचा निकाल, महाविद्यालयातील सुविधा, आऊटकम बेस शिक्षण इत्यादी तंत्रशिक्षणातील दर्जेदार शैक्षणिक अभ्यासक्रमांचे मुल्यांकन करून सिव्हील इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनीअरींग या प्रोग्राम्सना गुणवत्तेच्या आधारावर एन.बी.ए. चे मानांकन दिले. तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणा-या सर्व महाविद्यालयांना एन.बी.ए. करून घेणे अनिवार्य आहे.
इंजिनीअरिंगय्याने आपल्या नाविन्यपुर्ण टिचींग-लर्निंग संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त तज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने विद्याथ्र्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील संधीची जाणीव करून देऊन अध्यापनाच्या अत्याधुनिक व प्रयोगात्मक पध्दतीचा अवलंब करून तंत्रशिक्षणातील नवी दिशा व त्याची ओळख प्राप्त करून देण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आज एन.बी.ए. सारखे सर्वोच्य मानांकन प्राप्त झाले आहे. जे विद्यार्थी अशा महाविद्यालयात प्रवेश घेतील त्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्याधिष्ठित शिक्षण प्राप्त होईल जेणेकरून औद्योगिक क्षेत्रातील संधी विद्याथ्र्यांना सहजपणे प्राप्त होतील.
इंजिनीअरिंगय्यास मिळालेल्या एन.बी.ए. मानांकनामुळे सर्वच स्तरातून संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवेश्वर धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, उपप्राचार्य गोपाळ दंडिमे सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh