Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

नॅक मूल्यांकनात राज्यातील २३ उच्च शैक्षणिक संस्था पास

Image



मुंबई प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती समिती) च्या मूल्यांकनाच्या निकालानुसार राज्यातील केवळ २३ उच्च शैक्षणिक संस्था मूल्यांकनात पात्र ठरल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये राज्यातल्या केवळ २ उच्च शैक्षणिक संस्थांना ए दर्जा मिळाला असून मूल्यांकनाच्या तिसऱ्या टप्प्यात या संस्थांचा समावेश आहे. ज्या उच्च शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनाला स्थगिती मिळाली आहे त्यामध्ये राज्याच्या ४ संस्थांचा समावेश आहे.

नॅक मूल्यांकन स्थायी समिती ३५ व्या स्थायी समितीकडून अखेरच्या मूल्यांकनासाठी पात्र ठरविल्या गेलेल्या देशातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनाचा निकाल ८ मार्च रोजी नॅककडून जाहीर करण्यात आला आहे. नॅक मूल्यांकनाच्या पहिल्या टप्प्याच्या निकालात राज्याच्या १० शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. यातील २ संस्थांना बी प्लस प्लस तर ३ संस्थांना सी ग्रेड मिळाले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या निकालात राज्याच्या ७ संस्थांचा समावेश आहे. त्यातील फक्त एकाच संस्थेला बी प्लस प्लस दर्जा मिळाला आहे.

तिसस्या टप्प्याच्या निकालात ६ संस्थांचा समावेश असून ए दर्जाच्या २ तर बी प्लस दर्जा प्राप्त झालेल्या ३ संस्थांचा समावेश आहे. राज्यातील एकही उच्च शैक्षणिक संस्था मूल्यांकनाच्या चौथ्या टप्प्यात नाही. मात्र ज्यांच्या मूल्यांकनाला अद्याप स्थगिती मिळाली आहे अशांमध्ये राज्याच्या ४ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.


नॅकच्या नवीन मूल्यांकन पद्धतीनुसार ७० टक्के संख्यात्मक विश्लेषण, २५ टक्के तज्ज्ञ समितीकडून केली जाणारी पाहणी आणि ५ टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून घेतला जाणारा आढावा याचा समावेश आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकन प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता आल्याची माहिती तज्ज्ञ समितीकडून देण्यात आली आहे. उच्चशिक्षण संस्थेला आपला स्वयंअभ्यास अहवाल ऑनलाइन, अन्य माहिती, पुरावेसुद्धा ऑनलाइनच द्यावे लागणार आहेत.


राज्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती समितीकडून (नॅक) मूल्यांकन करून घेण्याची सक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. मात्र, बहुसंख्य महाविद्यालयांनी अद्यापही त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. एकदाही ‘नॅक’ मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांची संख्याही जास्त असल्याचे पाहायला मिळ

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh