Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

विश्वेश्वर संस्था महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर असेल- अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार राष्ट्रीय पातळीवरील विश्व फार्मा व विश्व व्हर्टेक्सचे शानदार उद्घाटन

Image

औसा- तालुक्यातील आलमला येथे सुरु असलेल्या विश्वेश्वर फेस्टीव्हल 2019 मध्ये राष्ट्रीय पातळीवरील विश्व व्हर्टेक्स व विश्व फार्मा पोस्टर प्रझेटेंशन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. राजाराम पोवार यांनी आपल्या मार्गदर्शनात सदरील संस्था ही आपल्या दर्जेदार व अत्याधुनिक शिक्षणपध्दतीमुळे येणा­या काळात महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर नावलौकीक करत असल्याचे गौरवोद्गार काढले. या स्पर्धेकरीता महाराष्ट्रासह कर्नाटक, आंधप्रदेश येथून एकुण 568 विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदविला.

शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्म डी. (डॉक्टर ऑफ फार्मसी), दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेज व विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील विश्व व्हर्टेक्स व विश्व फार्मा पोस्टर प्रझेटेंशनचे उद्घाटन डॉ. राजाराम पोवार, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. ए.एम. आगरकर, प्राचार्य, शासकीय महिला निवासी, तंत्रनिकेतन,लातूर, डॉ. केतन मारुळकर, वरीष्ठ व्यवस्थापक, औषध सुरक्षा विभाग, मायलॅन लॅबोरेटरीज्, हैद्राबाद, डॉ. गजानन मोतीपवळे हे मान्यवर उपस्थितीत होते.

याप्रसंगी डॉ. जंगमे सी.एम., डॉ. बिराजदार अरुणादेवी, डॉ. होगाडे, प्राचार्य शिवहार चवळे, प्रा. रामलिंग सुगावे, प्रा. प्रताप भोसले, प्रा.मगर एस.एन., प्रा.कुदरत पटेल, प्रा. याचे प्रकाश, प्राचार्य प्रशांत धाराशिवे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, प्रा. दिनेश गुजराथी इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांनी संस्थेतील विविध युनिटच्या माध्यमातून चालणा­या उपक्रमांची माहिती दिली आणि पालकत्व पध्दतीने विध्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करुन आदर्श पिढी निर्माण करण्याचे कार्य संस्था अविरतपणे करत राहील.

डॉ. राजामराम पोवार यांनी आपल्या मार्गदर्शनात वैद्यकीय व अभिंयात्रिकी क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीची विध्यार्थ्यांना सखोल प्रमाणात माहिती दिली. जेव्हा विद्यार्थी औषधनिर्माणशास्त्राचा शिक्षण घेऊन ते फार्मासिस्ट म्हणुन नोकरी करतो आणि फार्मासिस्टच म्हणुन निवृत्त होतो याबद्दल शासनाने ग्रेडर काढुन पदोन्नती देण्याबाबत विचार करावा असे नमूद केले. औषधनिर्माणशास्त्राचे शिक्षण भारतात चांगल्या प्रकारे दिले जाते त्यामुळे संशोधन होते तर परदेशात कनस्पेट दिले जाते म्हणुन तेथे शोध होते यामुळे विद्याथ्र्यांनी आपली स्वत:ची मेडीकल फार्मसी निर्माण करावी.

प्रमुख पाहुणे डॉ. ए.एम. आगरकर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना विश्वेश्वरय्या पॉलिटेक्नीक मराठवाडयातून एनबीए या शिखर परीषदेच्या मानांकनासाठी सामोरी जाणारी एकमेव संस्था असून सदरील संस्थेतील विद्याथ्र्यांनी लातूरच्या वॉटर मॅनेजमेंटसाठी राष्ट्रीयपातळीवर आपले प्रयोग सादर करावेत त्यांना नक्कीच मान्यता मिळेल आणि येत्या पाच वर्षांत संस्था राष्ट्रीय पातळीवर लौकीक करेल असे मत प्रकट केले.

विश्व फार्मा राष्ट्रीय पातळीवरील ओरल प्रझेंटेशन, मॉडेल मेकिंग व पोस्टर पझेटेंशन मध्ये जवळपास 177 विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला व सादरीकरण केले.विश्व व्र्टेक्स राष्ट्रीय पातळीवरील सादरीकरणास जवळपास 391 विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला यामध्ये पेपर प्रझेटेशन, प्राजेक्ट प्रझेटेंशन, क्वीज कॉम्पीटयुशन, मॉडेल मेकिंग, रोबोटेक्स व रोबोवार करीता सहभाग नोंदविला. सदरील सादरीकरणास इंजिनिअरींग व फार्मसी क्षेत्रातील तज्ञ प्राध्यापक उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाना संस्थेच्या वतीने रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांनी केले तर प्राचार्य प्रशांत धाराशिवे यांनी आभार व्यक्त केले.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh