Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

विध्यार्थ्यानी कोणत्याही क्षेत्रात निष्ठेने केलेले कार्य हे राष्ट्रसेवाच असते- उपकमांडट-हरीसिंगजी आलमला फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय फार्मा व्हॉलीकपच्या उद्घाटन प्रसंगी

Image

औसा (प्रतिनिधी)- तालुक्यातील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्म डी. (डॉक्टर ऑफ फार्मसी) व दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेज, आलमला, ता. औसा, जि. लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने “5 वे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन फार्मा व्हॉली कप 2019” चे उद्घाटन हरीसिंगजी, उप कमांडट, सीआरपीएफ कॅम्प, लातूर यांच्या शुभहस्ते मशाल प्रज्वलीत करुन व फित कापुन दि. 15/02/2019 रोजी करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे,उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवेश्वर धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, महाराष्ट्र पॉलीटेक्नीक डी. फार्मसी इन्स्टीटयुट चे प्राचार्य डॉ. बी.एन. पौळ, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.एस.पाटील, सरपंच कैलास निलंगेकर, आलमला सोसाटीचे चेअरमन विश्वनाथ बिराजदार, जयशंकर हुरदळे, विश्वनाथ निलंगेकर, सिध्दलिंग निलंगेकर,महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, रामनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस.बिराजदार, एल.पी. बिराजदार, रंगनाथ आंबुलगे, अहमद तांबोळी, रमजान मुलानी, बालाजी गायकवाड,विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. रेवण बुक्का, प्रविण साबदे, मंगेश बिडवे, सतिष आंबुलगे, संदेश माडे, अंकुश बिडवे, प्रा. दिनेश गुजराथी, समीर शफी, वागदरे एस.एस.इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेने ज्या पध्दतीने स्पर्धेचे आयोजन केले आहे ते पाहुन भाराऊन गेल्याचे हरीसिंगजी यांनी आपले मनोगतात व्यक्त केले याहीपेक्षा अधिक भारावून गेलो ते या संस्थेने दि. 14/02/2019 रोजी जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांकरीता जे दोन मिनीटांचे मौन धारुन करुन श्रध्दांजली अर्पित केली. पुढे विध्यार्थ्यांना मागदर्शन करताना वेळेचा सद्उपयोग करुन योग्य नियोजनानुसार करीअर घडविण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात असाल तेथे ईमानदारी, निष्ठा आणि जिद्दीने कार्य करा. सामाजीक अथवा कोणत्याही क्षेत्रात केलेले कार्य हे एक राष्ट्रसेवेचाच भाग असल्याचे विध्यार्थ्यांना व उपस्थितांना सांगितले. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आलेल्या चढउतारांचा सामना करुन यश संपादन करावे, याकरीता अथक परीश्रम करण्याची विध्यार्थ्यानी तयारी ठेवल्यास आयुष्यात यशस्वी होण्यापासून आपणास कोणीही रोखू शकत नाही हे आवर्जून नमुद केले. तसेच उत्तम व्यवस्थापन व आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले व स्पर्धेत सहभागी संघाना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत महाराष्ट्रातील एकुण 35 संघानी सहभाग नोंदविला यामध्ये मुलांचे 28 संघ तर मुलींचे 7 संघ सहभागी आहेत. महाविद्यालयाच्या वतीने खेळाडूचे प्रोत्साहन वाढविण्याकरीता एकुण 151 विद्यार्थी सहभागी असलेल्या आकर्षक समुहनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक संघाने मान्यवरांना मानवंदना देऊन, शपथ घेतली. तद्नंतर जेएसपीएम, पुणे व शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी आलमला या सामन्याची सुरुवात मोठया जल्लोषात व विध्यार्थ्यांच्या टाळयांच्या गजरात करण्यात आली. या स्पर्धेकरीता अम्पायर म्हणुन दिपक पाटील, मुनाळे सुनिल, प्रा. विजय हांडे, एल.पी.बिराजदार, रंगनाथ आंबुलगे कार्यरत आहेत.
सुत्रंचालन प्रा. सचिन हंगरेकर व सुरज मालपानी यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरीता संघ व्यवस्थापक प्रा. प्रशांत धुमाळ व शेख ईरशाद, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh