Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र करणार विठ्ठल-रखुमाईची महापुजा

Image

पंढरपूर- अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पत्नीसोबत विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा आहे. पण यावेळेस फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूजा करणार नाहीयेत, तर त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही विठ्ठलाची पूजा करताना दिसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विजयी 18 खासदारांनाही आपल्यासोबत पंढरपूरला घेऊन जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांसोबत अयोध्या वारी केली होती, त्यासोबतच कोल्हापूरच्या अंबाबाईचेही दर्शनही घेतले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरमध्ये जाणार आहे आणि सोबत आपल्या सर्व 18 विजयी खासदारांनाही घेऊन जाणार असल्याची शक्यता आहे.


लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने पंढरपूरात महासभा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. त्यानंतर आता येत्या विधानसभा निवडणुकीत विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाजप-शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारी दरम्यान दिल्लीत अधिवेशन सु डिग्री होते, त्यामुळे त्यांना काही खासदारांना दिल्लीत घेऊन जाता आले नव्हते. पण आता आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या सोबत सर्व खासदारांना घेऊन विठ्ठल-रखुमाईची महापुजा करणार असल्याची माहिती आहे.


दरम्यान पांडुरंगाचे दर्शन मिळावे म्हणून आधीच वारकरी 36 ते 48 तास दर्शनाच्या रांगेत उभे असतात. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पूजेमुळे आधीच दर्शनाची रांग 2 तास थांबवली जाते. पण आता मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत सर्व खासदार असणार आहेत, या सर्वांचे दर्शन व्हीआयपी रांगेतून होणार असल्याने वारकऱ्यांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.


Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh