Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

दहावी बोर्डाचा निकाल जाहीर , यंदाच्या निकालातही मुलींचीच बाजी

Image

मुंबई प्रतिनधी - दहावी बोर्डाचे निकाल जाहीर झाला असून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६७. २७ टक्के इतका लागला आहे. एकूण १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.

राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के. निकालात तब्बल १२ टक्के घट. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरची ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळे गुणफुगवटा आटमार्च २०१९ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या होती ७ लाख ४८ हजार ७१५ आणि विद्यार्थ्यांची संख्या होती ८ लाख ७० हजार ८८७. या सगळ्यांपैकी एकूण १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ७७.१० टक्के लागला आहे. यामध्ये विद्यार्थिनींचा निकाल हा ८२.८२ टक्के इतका लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल आहे ७२.१८ टक्के त्याचमुळे यंदाच्या निकालातही नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या तुलनेत १०.६४ टक्क्यांनी जास्त लागला आहे. अशीही माहिती शकुंतला काळे यांनी दिली.

राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १० जूनपासून अर्ज करता येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.ला आहे अशी माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh