Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

बालभारतीकडे ३ कोटी ४० लाख पाठ्यपुस्तकांची नोंदणी

Image



नागपूर प्रतिनिधी -: समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जि.प.च्या शाळेतील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. त्यासाठी शाळांना बालभारतीकडे पाठ्यपुस्तकाची मागणी नोंदवावी लागते. येणाऱ्या सत्रासाठी १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ४० लाखाहून अधिक किमतीच्या पाठ्यपुस्तकाचीऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे धोरण आहे. याअंतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित, शासकीय, अंशत: अनुदानित, समाजकल्याण अनुदानित या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येतो. २०१९-२० या वर्षाकरिता शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहे, हे विशेष. जि.प. च्या शाळांनी बालभारतीच्या वेबसाईटवर पटसंख्येनुसार ही नोंदणी करावयाची होती. शाळेने भरलेल्या यु-डायसनुसार वर्ग १ ते ५ ला ९९,१११ विद्यार्थी, ५ ते ८ ला ९८, ८०५ असे एकूण १ लाख ९७ हजार १६ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. शाळांना मागणीनुसार पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली असून, त्यांच्यामार्फत मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तकाची उचल बालभारतीकडून करण्यात येणार आहे.
इयत्ता १ ते ८ मधील एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व तालुकास्तरीय शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना केले आहे. पुस्तके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हास्तरातून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठ्यपुस्तके ब्लॉकस्तरावर उपलब्ध होतील. तेथून ती शाळांनी प्राप्त करावयाची आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शाळेत सर्व पुस्तके पोहोचविण्याचे नियोजन असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ जून रोजी पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहे

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh