Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

३ लाख शेतकऱ्यांची कृषी विभाग घेणार शाळा

Imageपुणे प्रतिनिधी : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांची मशागतपूर्व, लागवडीनंतर व वाढीदरम्यान काळजी कशी घ्यावी, शेतमालाचे प्रतवारीकरण, पॅकेजिंग कसे असावे या विषयी राज्यातील तब्बल ३ लाख शेतकऱ्यांची कृषी विभाग शाळा घेणार आहे. सोयाबीन, भात, कापूस, तूर, मका, ज्वारी व हरभरा या पिकांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी साखर संकुल येथे कृषी विभागाची आढावा बैठक झाली. त्यात शेतकरी शेती शाळेचे नियोजन केले. राज्यातील १२ हजार गावांमध्ये येत्या खरीप हंगामापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या गावांमधील प्रत्येकी २५ शेतकऱ्यांची या उपक्रमा अंतर्गत निवड करण्यात येईल. त्यात प्रयोगशील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी विभागा अंतर्गत असलेले सर्व उपविभाग एकत्रित येऊन एक मोहीम म्हणून ही योजना राबविणार आहेत.

कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात शेतकरी शेतीशाळा घेण्यात येईल. पेरणीपूर्व घ्यायची दक्षता, जमीनीची मशागत, बियाणांची निवड, लागवड कालावधी, जमिनीच्या सुपिकता निर्देशांका प्रमाणे खतांचा वापर, पिकाची वाढीची अवस्था, कीड रोग नियंत्रण व्यवस्थापन याची माहिती दिली जाईल. या शिवाय शेतमालाचे , पॅकेजिंग याबाबतही शेतकस्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर या शेतकस्यांनी आपल्या गावातील इतर शेतकस्यांना प्रशिक्षित करणे अपेक्षित आहे.

या मोहीमेसाठी राज्य आणि विभागस्तरावर समन्वयकांची नेमणूक केली असून, त्यांना २ हजार क्षेत्रिय अधिकारी आणि कर्मचारी व राज्यातील २० हजार शेतकरी मित्र मदत करतील. तसेच, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व पुरस्कार प्राप्त शेतकस्यांचाही यात सहभाग असणार आहे. विकास शेती शाळेच्या प्रशिक्षण, प्रसिद्धीसाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकास्यांनी दिली.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh