Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

Image



मुंबई प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाच्या २२, २३ व २४ एप्रिल २०१९ या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसेच २९ व ३० एप्रिल २०१९ या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीचे दोन्ही टप्पे मिळून एकूण ७६ परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या असून २७ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे.


यानुसार वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ३०, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या १७, तर आंतरविद्या शाखेच्या २९ परीक्षा अशा एकूण ७६ परीक्षा वरील ५ दिवसाच्या तारखांदरम्यान सुरु होणार होत्या. त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या असून, या परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

तसेच लोकसभा निवडणुकीमुळे २७ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. यातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या ४, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ५ व आंतरविद्या शाखेच्या १८ परीक्षा असून या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. म्हणजेच या परीक्षा निवडणुकीपुर्वी सुरु होत आहेत. यातील काही पेपर हे निवडणुकीच्या तारखे दरम्यान येत असल्याने तेवढ्याच पेपरचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलेले आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (हॉल तिकीट) देखील दर्शविण्यात येईल.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान येत असलेल्या काही परीक्षांच्या तारखा व काही परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहेत. बदललेल्या परीक्षा या निवडणुकीनंतर लावण्यात आलेल्या आहेत. कमीत कमी बदल करण्याचा विद्यापीठाने प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनी या बदललेल्या तारखांची व वेळापत्रकांची नोंद घ्यावी.
-डॉ विनोद पाटील , संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh