Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

निवडणुकीच्या कामातून १० वी, १२ वीच्या शिक्षकांची सुटका

Image

मुंबई : दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोर्डाचे पेपर तपासणा-यांना निवडणुकांचे काम देऊ नये, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणुकांच्या कामातून वगळले जावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. निवडणुकांच्या कामामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबण्याची भीती होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

यासाठी शिक्षक संघटनांनी प्रयत्न केले होते. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने याप्रकरणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, शिक्षण सचिव व बोर्डाला पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५ जूनपूर्वी बोर्डाचे निकाल लावण्यासाठी दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी केली होती.

बोर्डानेही सकारात्मक प्रतिसाद देऊन शिक्षण सचिव आणि सर्व जिल्हाधिका-यांना याबाबत विनंती केली होती. शिक्षक संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे निवडणूक आयोगाने हा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वीही २०१४च्या लोकसभा व २०१७च्या महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवेळी अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला होता.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh