Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

शालेय पुस्तकात "अभिनंदन" यांची शौर्यगाथा समाविष्ट होणार

Image

नवी दिल्ली वृत्तसंस्था - मिग-21 विमानातून एफ-16 सारखं अत्याधुनिक विमान जमीनदोस्त करणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांचं सध्या सर्वत्र कौतुक सु डिग्री आहे. जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशात परतलेल्या अभिनंदन यांची आकाशाची ओढ कायम आहे. भारतीय हवाईदलाचे धाडसी पायलट अभिनंदन यांची शौर्यगाथा आता शाळेतील पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होणार आहे. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना लवकरच शौर्याचे धडे गिरवता येणार आहेत. राजस्थानचेशिक्षणमंत्री गोविंद सिंह डोटासरा यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

राजस्थान सरकारने अभिनंदन यांचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी अभिनंदनदिवस असा हॅशटॅगही वापरला आहे. कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना हा धडा असणार आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. पुलवामातील शहीदांची कथाही या धड्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. अभ्यासक्रम तयार करणाऱ्या समितीने हा प्रस्ताव स्विकारला आहे. राजस्थानच्या शिक्षण विभागाने सरकारी संरक्षण अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन केले आहे. ही अ‍ॅकॅडमी तरुणांना भारतीय सैन्यदलांमध्ये संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करणार असल्याची माहिती गोविंद सिंह डोटासरा यांनी दिली आहे.

जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशी परतलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पुन्हा एकदा उड्डाण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन एअर स्ट्राइकवर सविस्तर भाष्य केलं. यावेळी त्यांना अभिनंदन पुन्हा विमान उड्डाण कधी करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. "ते (विंग कमांडर अभिनंदन) पुन्हा विमान उड्डाण क डिग्री शकतात की नाही, हे त्यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीवरून ठरेल. अभिनंदन यांनी त्यांच्या विमानातून उडी घेतली. यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जात आहेत. ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झाल्यावर कॉकपिटमध्ये परततील," असे धनोआ यांनी सांगितले आहे.

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पाकिस्तानच्या हवाई दलाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची मिग-21 विमानं हवेत झेपावली. यावेळी दोन्ही हवाई दलांमध्ये संघर्ष सु डिग्री असताना अभिनंदन यांनी पाकिस्तानचं एफ-16 हे अत्याधुनिक विमान जमीनदोस्त केले. अभिनंदन हे एफ-16 विमान पाडणारे भारतीय हवाई दलाचे पहिले वैमानिक आहेत.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh