Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

रिक्त पदांच्या विषयनिहाय आरक्षणामुळे शेवटच्या घटकाला १५० वर्षांनी मिळणार लाभ

Image

औरंगाबाद : राज्य शासनाने अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त पदांच्या ४० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. यातच मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आल्याने शिक्षण संस्थांतील बिंदुनामावली तपासणी जोरात सु डिग्री आहे. विषयनिहाय बिंदुनामावली मंजूर करण्यात येत असल्यामुळे आरक्षित प्रवर्गातील शेवटच्या बिंदुला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी १५० वर्षे वाट पाहावी लागणार असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

उच्चशिक्षण देणाऱ्या अनुदानित संस्थांमधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती करण्यासाठी ५ डिसेंबर २०१८ आणि ७ जानेवारी २०१९ रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार बिंदुनामावली तपासून देण्यात येत आहे. आरक्षणाचा बिंदू महाविद्यालयऐवजी विषयानुसार तपासण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये केवळ एका विषयाच्या दोन जागांचीच मंजुरी आहे. मराठवाड्यात सामाजिकशास्त्रे विषयांसाठी एकाच जागेला मंजुरी आहे.

ज्या महाविद्यालयात दोन जागा आहेत. त्यापैकी पहिल्या जागेला आरक्षण लागू होत नाही. ती जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटते. दुसरी जागा आरक्षित प्रवर्गासाठी दिली जाते. छोट्या संस्थेतील एकाच आरक्षित जागेवर ७ जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीचा बिंदू येतो. यानंतर दुसरा बिंदू अनुसूचित जमाती, तिसरा बिंदू विमुक्त जाती-भटक्या जमाती (अ, ब, क, ड), चौथा ओबीसी, पाचवा बिंदू विशेष मागास प्रवर्ग आणि सहावा बिंदू एसईबीसी, अशी क्रमवारी आहे. प्रत्येक प्रवर्गाचा उमेदवार सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढील प्रवर्गास संधी मिळेल.

या क्रमवारीत आरक्षणाचा सर्वात शेवटचा लाभार्थी नुकतेच आरक्षण मिळालेला मराठा समाज म्हणजेच एसईबीसी प्रवर्ग असणार आहे. या प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी तब्बल १५० वर्षे जावी लागणार आहेत. सध्या मंजूर करीत असलेल्या बिंदूनुसार आरक्षित जागेवर अनुसूचित जाती प्रवर्गाला जागा सुटेल. या जागेवरील उमेदवार किमान ३० वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यावर अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाला संधी मिळेल. अशी प्रत्येकी प्रवर्गातील ३० वर्षे धरल्यास शेवटच्या घटकाला लाभ मिळण्यासाठी १५० वर्षांची वाट पाहावी लागणार आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh