Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजीटल पध्दतीने जतन करणार

Image

पुणे : देशातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक प्रमाणपत्रे डिजीटल पध्दतीने जतन केली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळून पाहणे सहज शक्य होणार आहे. नॅशनल अ‍ॅकॅडमिक डिपॉझटरी मार्फत या प्रमाणपत्रांचा डाटा जतन केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकश जावडेकर यांनी शनिवारी दिली.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २० व्या पदवी प्रदान समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगु डिग्री डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगु डिग्री डॉ. विश्वजीत कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धापतेसह आदी उपस्थित होते. यावेळी संत शिरोमणी जैन आचार्य विद्यासागरजी महामुनीराज यांना विद्यापीठाची डी. लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. आचार्य महामुनीराज यांच्या प्रतिनिधींनी या पदवीचा स्वीकार केला.
प्रकाश जावडेकर म्हणाले, बनावट पदव्या तयार होऊ नयेत, दुसऱ्याच्या नावावर तोतया बनून कुणाला परीक्षा देता येऊ नये यासाठी पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्याथ्यार्चा फोटो छापणे बंधनकारक करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याचबरोबर आता सर्व विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांचा डाटा नॅशनल अ‍ॅकॅडमिक डिपॉझटरी मार्फत एकत्र करून जतन केला जाणार आहे. यामुळेही पदवीची सत्यता पडताळून पाहणे सोपे होणार आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत त्याचे एकत्रीकरण केले जाईल.
जगाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर गुणवत्ता हाच एकमेव निकष आहे. इथून पुढच्या काळात गुवत्तेच्या आधारेच विद्यापीठांना स्वायत्तता मिळेल. आज डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून १ लाख ८० हजार ग्रंथ शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे जावेडकर यांनी सांगितले.
शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात यंदा वाढ केली आहे. २०१४ मध्ये शिक्षणावर ४७ हजार कोटी रुपयांची तरतूद शिक्षणासाठी होती. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यामध्ये वाढ करून सव्वा लाख कोटीपर्यंत वाढवली असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी विद्यार्थ्यांना ध्येय आणि मूल्यांप्रती अढळ राहण्याचा संदेश दिला. कुलगु डिग्री प्रा.डॉ. माणिकराव साळुंखे विद्यापीठाचा अहवाल सादर केला. प्रा. राजेंद्र उत्तूरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh