Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

इयत्‍ता 5 वी, 8 वी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्‍तीत वाढ

Image



मुंबई प्रतिनिधी - शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी इयत्‍ता 5 वी आणि 8 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्‍ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची घोषणा देखील करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आणि बालभारती नियामक मंडळाची शुक्रवारी मुंबईत बैठक पार पडली. त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. यापुर्वी 5 वी आणि 8 वीच्या शिष्यवृत्‍तीधारक विद्यार्थ्यांना 9 प्रकारांमध्ये 20 रूपये एवढी कमी शिष्यवृत्‍ती मिळत होती. वर्षाला केवळ 240 रूपये आणि दोन वेगवेगळया प्रकारांमध्ये 100 रूपये प्रति महिना असे शिष्यवृत्‍तीचे स्वरूप होते. आता त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व 11 प्रकारच्या शिष्यवृत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्‍तीच्या रक्‍कमेशिवाय प्रति विद्यार्थी वार्षिक रक्‍कम 750 रूपये बालभारतीमार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 32 हजार शिष्यवृत्‍तीधारक विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि पूरामुळं बाघलेल्या 2177 शाळांसाठी तसेच इतर मोडकळीस आलेल्या आणि पडलेल्या शाळांच्या उभारणीसाठी 57 कोटी रूपयांचा निधी मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh