Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान मिळणार

Image

मुंबई प्रतिनिधी : विनाअनुदानित शाळांना २० टक्के, तर आधीच २० टक्के अनुदान मिळणा-या शाळांना ४० टक्के अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. मुंबईत हैदराबाद विद्यापीठ स्थापन करण्याचा आणि नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा अक्षरश: पाऊस पडला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शैक्षणिक सुधारणांवर सर्वाधिक जोर देण्यात आला. या बैठकीत शासकीय आश्रमशाळांचे इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद आणि शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील आंतरवासीतांचे विद्यावेतन सहा हजारांवरून अकरा हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे.
कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र’ सु डिग्री करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक अंतर्गत एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवीचे वर्ग सु डिग्री करण्यात येणार असून, कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळा ठाणे जिल्ह्याच्या कल्याण येथील अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेस हस्तांतरित व स्थलांतरित करून आदिम जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाने घेतलेले अन्य निर्णय : ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या टप्पा २ व ३ ला मान्यता, मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा क्लस्टरद्वारे पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा, शहरांमधील विघटनशील (ओल्या) कच-यापासून तयार करण्यात येणा-या कंपोस्ट खतनिर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान, नाशिकच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज स्वरूपात निधी मिळण्यासाठी शासन हमी, नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणार. सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

३०४ कोटी रुपयांची तरतूद:आशिष शेलार
राज्यात अनुदानावर आलेल्या शाळांना अनुदान वितरीत करण्यासाठी राज्य सरकारकडून ३०४ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तरतुदीनुसार राज्यातील सर्व अनुदानाचे वितरण विहित निकषाच्या कार्यपद्धतीत केले जाणार आहे. यामुळे राज्यात असलेल्या ४ हजार ६२३३ शाळा, ८ हजार ८५७ तुकडय़ा आणि या शाळांवर असलेल्या ४३ हजार ११२ शिक्षक आणि शिक्षकेतर यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh