Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

राज्यात अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ

Image


मुंबई प्रतिनिधी -सध्या राज्यात अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे पंचवीस हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांमध्ये जवळपास पाचशे शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्यावर्षी अतिरिक्त शिक्षकांचा हा आकडा शंभर होता.

यावर्षी अकरावीसाठी ५८ हजार २४० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली गेली. त्यासाठी ३० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. मात्र प्रवेशाच्या दोन फेऱ्या झाल्या असून फक्त २० हजार ८२९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.आता अकरावीच्या तिसऱ्या फेरीस उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर विशेष फेरी घेण्यात येईल.

साधारणत: महाविद्यालयांमध्ये १२० विद्यार्थ्यांना मिळून एक तुकडी बनवली जाते. या १२० विद्यार्थ्यांच्या एका तुकडीसाठी तीन शिक्षकांचा समावेश करण्यात येतो. मात्र, कला आणि वाणिज्य किंवा विज्ञान अशा संयुक्त शाखांचे महाविद्यालय असल्यास त्यांना साडेचार शिक्षकांची मान्यता मिळते. परंतु यंदा झालेल्या प्रवेश प्रक्रियेत कला शाखेत ९ हजार ४१६ जागा, वाणिज्य शाखेत १७ हजार ७४४ जागा तर विज्ञान शाखेत २७ हजार ६० अशा जागा आहेत. मात्र येथे अनुक्रमे १ हजार ५८१, वाणिज्य शाखेत ५ हजार १४४, तर विज्ञान शाखेत १३ हजार ८०५ जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यामुळे तब्बल ३७ हजार ४११ जागा अद्याप रिक्त आहेत.

आता तिसरी होणार आहे, त्यानंतर विशेष फेरी घेण्यात येईल. ते प्रवेश झाले तरी त्यातील ३० हजार जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे जवळपास २५० होणार नाहीत. त्यामुळे किमान पाचशे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh