Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

सत्ता निरंकुश होऊ न देण्याची भूमिका माध्यमांनी जबाबदारीने पार पाडावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image

सत्ता निरंकुश होऊ न देण्याची भूमिका

माध्यमांनी जबाबदारीने पार पाडावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसश्व् यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार सुरु करीत असल्याची घोषणा

श्व्

मुंबई प्रतिनिधी - सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असले पाहिजे. ही भूमिका त्यांनी जबादारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज येथे विविध पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रीयस्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रीय पत्रकारास यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

रमेश पतंगे, पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

या कार्यक्रमात २०१७ आणि २०१८ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी प्रदान केला. प्रत्येकी1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. २०१६ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार दै. हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना जाहीर झाला आहे. त्यांनी व्हीडीओ संदेशाद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

पत्रकारितेच्या क्षेत्रात उच्च दर्जाची कामगिरी केलेल्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे.काही ज्येष्ठ पत्रकारांना धनादेशाचे वितरण करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज या योजनेचा शुभारंभ केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासकीय व्यवस्था शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविणे, सर्वसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविणे यासोबतच समाजप्रबोधनाच्या कार्यात माध्यमांनी मोठे योगदान दिले आहे. पण आता माध्यमांचा संक्रमण काळ सुरु आहे. मुद्रीत माध्यमांपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल माध्यमांपर्यंत झाला आहे. या संक्रमणावस्थेतही माध्यमांनी आपली मूल्ये कायम जपली पाहीजेत. बातम्यांद्वारे अफवा पसरल्यास त्यातून समाजस्वास्थ्य बिघडते. त्यामुळे अशा संक्रमणाच्या काळात मूल्याधिष्ठीत पत्रकारिता करुन माध्यमांनी विश्वासार्हता जपावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पत्रकार सन्मान योजना सुरु झाल्याचा मनस्वी आनंद

तथ्य नसलेल्या बातम्यांचा खुलासा शासकीय यंत्रणेने तात्काळ करावा यासाठी आपण सतत आग्रही राहिलो. त्याचप्रमाणे तपशील खरा असेल तर अशा बातम्यांची दखल घेऊन त्याप्रमाणे कार्यशैलीत बदल करण्याच्या सूचनाही आपण संबंधित विभागास वेळोवेळी केल्या. निर्णय घेताना अशा बातम्यांचा नेहमीच सकारात्मक उपयोग झाला, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. पत्रकार हे दबावात काम करता कामा नयेत. पत्रकारांना सामाजिक सुरक्षाही असली पाहिजे. या भावनेतूनच शासनाने निवृत्त पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु केली. आज या योजनेची प्रत्यक्षात सुरुवात करताना मनस्वी आनंद होत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालक (माहिती) सुरेश वांदिले यांनी आभार मानले.

पत्रकारिता पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस

आज पुरस्कार मिळालेले पत्रकार कांचन श्रीवास्तव आणि राजकुमार सिंह यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देत असल्याची घोषणा केली. त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस आज प्रदान करण्यात आले.

वर्षा फडके – आंधळे, डॉ. किरण मोघे, डॉ. सुरेखा मुळे यांना शासकीय गटातील पुरस्कार प्रदान

माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना दिला जाणारा शासकीय गटातील २०१६, २०१७ आणि २०१८ साठीचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) अनुक्रमे मंत्रालयातील वरिष्ठ सहायक संचालक वर्षा फडके – आंधळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आणि मंत्रालयातील विभागीय संपर्क अधिकारी डॉ. सुरेखा मधुकर मुळे यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

तसेच छायाचित्रकारांना देण्यात येणारा २०१६, २०१७ आणि २०१८ साठीचा शासकीय गटातील केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील छायाचित्रकार प्रज्ञेश कांबळी, अमरावती येथील छायाचित्रकार मनीष झिमटे आणि अमरावती विभागीय माहिती कार्यालयातील चंद्रकांत आनंदराव पाटील यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh