मुंबई प्रतिनिधी
केंद्र आणि राज्य सरकारकडून 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया शालेय पोषण आहारात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी देण्यात येणारी तांदळाची खिचडी कमी करुन विद्यार्थ्यांना ज्वारी आणि बाजरीची भाकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना आता दुपारच्या जेवणात गरमा-गरम भाकरीचा आस्वाद घेता येणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांच्या जेवणात तांदळाची खिचडी, मटकी, वटाणा, चना या कडधान्यांचा समावेश होता. मात्र, शासनाने विद्यार्थ्यांना अधिक पौष्टीक अन्न मिळावे, यासाठी या मध्यान्ह भोजनात बदल केला आहे. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यापासून विद्यार्थ्यांन जेवणात ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून सर्वच शाळांना ज्वारी अन् बाजरीचा पुरवठा करण्यात येणार आहे.
मात्र, शाळा व्यवस्थापन या निर्णयामुळे नाराज झाले आहे. शासनाने या योजनेसाठी यंत्रणाही स्वतंत्र उभारावी, असे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.