Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

राज्यात एमबीबीएसच्या वाढल्या ९७० जागा

Imageनागपूर प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ९७० वाढीव जागांना अखेर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) मंजुरी दिली. यामुळे आता राज्यात एमबीबीएसच्या २७६० वरून ३७३० जागा झाल्या आहेत. या जागा नव्याने लागू होणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईडब्ल्युएस) अंतर्गत वाढविण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी) आणि आता एमबीबीएस (पदवी) प्रवेशाचा प्रश्न चिघळल्यानंतर अखेर राज्य सरकारने राज्यात एमबीबीएसच्या जागा वाढविण्याची मान्यता केंद्राकडून मिळवण्यात यश मिळवले. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी १५ जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेऊन महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागासाठी काही प्रस्ताव सादर केले. त्यानंतर या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉक्टरांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्रातील शासकीय व खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार ‘एमसीआय’ने ‘ईडब्ल्युएस’ अंतर्गत एमबीबीएसच्या वाढविण्यात आलेल्या जागेचा मंजुरीचे पत्र ई-मेलवर शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना प्राप्त झाले. यात शासकीय व खासगी मिळून २० वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागांमध्ये सरसकट १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. १७ महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ५० जागांची वाढ करण्यात आली, तर सर्वाधिक ७० जागा जीएस. मेडिकल कॉलेज, मुंबईच्या वाढविण्यात आल्या. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या ३७३० जागांवर प्रवेश देण्याचा मार्ग खुला झाला आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh