Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

गणेशोत्सवाला कोकणात जाण्या-या भक्तांसाठी १६६ विशेष मेल, एक्स्प्रेस धावणार

Image


मुंबई : गणेशोत्सवासाठी २८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत कोकणात जाण्यासाठी १६६ विशेष मेल, एक्सप्रेस धावणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, पनवेल आणि पुणे स्थानकावरून करमळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेडणे या स्थानकापर्यंत जाण्यासाठी तब्बल १६६ विशेष मेल, एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव म्हटले की, कोकणातला गणेशोत्सवाचा सोहळा सर्वात हटके असतो. तो साजरा करण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणात कोकणाला जातात. यासाठी दरवर्षी विशेष रेल्वेंची व्यवस्था केली जाते. यंदाही मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेसच्या २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत २६ फे-या चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ०१००१ मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेस मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून सुटेल. ही मेल, एक्स्प्रेस सावंतवाडीला दुपारी २ वाजून १० मिनिटांला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१००२ सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस त्याच दिवशी दुपारी ३ वाजता सावंतवाडीहून सुटेल. गाडी क्रमांक ०१००७ मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेसच्या १२ फे-या चालविण्यात येतील. २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या दरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी ती रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल. गाडी क्रमांक ०१००८ सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस दुपारी ३ वाजता सुटेल.

गाडी क्रमांक ०१०३३ मुंबई-रत्नागिरी-पनवेल २८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत २२ फे-या चालविण्यात येतील. ती सीएसएमटीहून सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल, तर गाडी क्रमांक ०१०३४ रत्नागिरीहून रात्री १० वाजून ५० मिनिटांनी सुटेल. याचप्रमाणे, पनवेल-सावंतवाडी-मुंबई २२ फे-या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेडणे ६ फे-या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते झाराप ६ फे-या, लोकमान्य टिळक टर्मिनस-झाराप-पनवेल ८ फे-या, पनवेल-सावंतवाडी ८ फे-या, पनवेल-थिवीम ८ फेऱ्या, पुणे-रत्नागिरी ६ फे-या (व्हाया कर्जत-पनवेल), पुणे-करमळी २ फे-या चालविण्यात येणार आहेत. यामुळे कोकणमध्ये गणेशोत्सवासाठी जाणा-या भक्तांना चांगली सोय होणार आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh