Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

बालमजूरी विरोधी अभियानाचे आयोजन 12 जून पर्यंत

Image



पुणे प्रतिनिधी : आजही अनेक ठिकाणी लहानमुलांना कामावर ठेवले जाते. अनेकदा त्यांच्याकडून बळजबरीने काम करुन घेतले जाते. बाल हक्क कृती समिती ( आर्क ) तर्फे राष्ट्रीय बालमजुरी विरोध दिन 30 एप्रिल ते जागतिक बाल मजुरी विरोधी दिन 12 जून पर्यंत बालमजूरी विरोधी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानामध्ये स्वाक्षरी मोहीम घेण्यात येणार असून त्याचबरोबर विविध उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. आज पुण्यातील संभाजी बाग परिसरामध्ये बालमजुरी विरोधात स्वाक्षरी मोहीम घेऊन या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी तीन प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या. त्यात शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती १८ वर्षापर्यंत वाढवा. १८ वर्षाआतील काम करणाऱ्या ( धोकादायक/ बिना धोकादायक ) प्रत्येक व्यक्तीचा बाल कामगार संज्ञेत समावेश करावा. बालमजुरी प्रतिबंध कायद्यातील कलम तीन काढून टाकावे. ज्यामध्ये कौटुंबिक व्यवसायातील बालकांचा सहभाग कायदेशीर मानले आहे. या मागण्यांचा समोवश होता.



या तीन प्रमुख मागण्या घेऊन वस्तीपातळीवर, शाळांमध्ये तसेच सामान्य नागरिकांमध्ये स्वाक्षरी मोहीम, पथनाट्य आणि पोस्टकार्ड उपक्रमाद्वारे हे अभियान राबविण्यात येत आहे. आर्क व्यासपीठातील हजारो मुलं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या मागण्या मांडणार आहे. आर्क हे बाल हक्कांवर काम करणाऱ्या संस्थाचे व्यासपीठ आहे. बालमजूरी ही अनिष्ठ प्रथा असून बालमजुरीमूळे लाखो मुलांचे बालपण हरवले आहे. या प्रथेचे मुळासकट उच्चटन होणे आवश्यक आहे. ही बालहक्क कृती समितीची भूमिका आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh