Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

विद्यापीठ दुष्काळग्रस्त 822 विद्यार्थ्यांना मिळाले महिन्याचे खानावळीचे पैसे

Image


औरंगाबाद - दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने खानावळीचे पैसे देणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणे पहिल्या महिन्याचे प्रत्येकी 1100 रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात अदा केले आहेत. विद्यापीठात शिकणाऱ्या 822 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्यातील विद्यापीठांमधील हा एकमेव उपक्रम आहे.

विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील सर्वच जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. विद्यापीठात शिक्षण घेणारे शेतकरी, शेतमजुरांच्या व अर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांनाही दुष्काळाचा फटका बसला आहे. शिक्षणात अडथळा येऊ नये, म्हणून स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींची मदत घेण्याचे व्यवस्थापन परिषदेत ठरले. त्यानुसार स्थापन झालेल्या डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीने मदतीचे आवाहन केले. त्याला मुंबईतील केअरिंग फ्रेंड्‌स संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या अटीवर 22 लाख रुपये देण्याचे मान्य केले; तसेच दहा लाख रुपयांचा पहिला हप्ता विद्यापीठाच्या खात्यावर जमा केला. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिवशीच म्हणजे मंगळवारी (ता. 12) विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या खात्यात जेवणासाठीची रक्‍कम अदा केली आहे.

केअरिंग फ्रेंड्‌सतर्फे कुणीही विद्यापीठाला भेट न देता दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल संस्थेचे निमेष सुमती यांचे विद्यापीठाने आभार मानले आहेत. यासाठी अंबाजोगाईच्या मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनीही विशेष सहकार्य केले. यांच्यासह इतर दानशूर व्यक्‍तींनी चार लाख रुपयांची मदत दिली होती. तसेच विद्यापीठानेही याकामी दहा लाख रुपये दिले आहेत.


विद्यार्थ्यांनाही लाभ
विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रातील 50 विद्यार्थ्यांनादेखील मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे डॉ. नरेंद्र काळे यांनी सांगितले; तसेच भरीव मदतीबद्दल निमेष सुमती, अनिकेत लोहिया यांना विद्यापीठात आमंत्रित करून सत्कार करण्यात येणार आहे.


अर्ज मागवून पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. चार महिने प्रत्येकी अकराशे रुपये देण्यात येणार आहेत. 472 मुले आणि 350 मुलींना 9,04,200 रुपये इतकी एका महिन्याची
मदत देण्यात आली आहे.
-

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh