Breaking news
23-07-2018 : 12:08:51

काँग्रेसकडून निवडणुकीचे बिगूल ; राहुल गांधींकडे महाआघाडीचे सर्वाधिकार

23-07-2018 : 12:07:44

पंढरपुरात जाधव दाम्पत्याकडून पूजा; मुख्यमंत्र्यांची मुंबईत विठ्ठलपूजा

22-07-2018 : 11:12:18

शंभर गिरीप्रेमींची कळसूबाई शिखरावर चढाई

22-07-2018 : 11:07:46

नितीश कुमारांचं दलितांना पदोन्नतीत आरक्षण

22-07-2018 : 10:59:29

तिरस्काराला प्रेम आणि आपुलकी हेच उत्तर- राहुल गांधी

22-07-2018 : 10:56:08

जीएसटी: १०० वस्तू स्वस्त, "या" वस्तू करमुक्त

21-07-2018 : 11:00:07

आषाढी यात्रेसाठी धावणार १९० जादा बसगाड्या

21-07-2018 : 10:59:40

हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार

17-07-2018 : 10:30:17

महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

17-07-2018 : 10:29:51

शिवरायांच्या आजोबांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्कमध्ये

13-07-2018 : 05:53:28

डेकोरेटर्सना धक्का; थर्माकोल बंदीवर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब

12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

‘आरटीई प्रवेशासाठी मोबाइल अ‍ॅप’द्वारे भरता येणार अर्ज

Image

नाशिक : आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाने पालकांना मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक अर्ज करता येणार असून, अर्ज करताना गुगल मॅपद्वारे घरचा पत्ता, शाळेचे अंतर असे सर्व ट्रॅकिंग होणार आहे. तसेच आरटीईच्या या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्जही भरता येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये यंदा ५ हजार ७६४ जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार असून, आरटीई अंतर्गत नाशिक तालुक्यातील १९ खासगी शाळांमध्ये २२१ विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक व प्राथमिक इयत्तेसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी ५ ते २२ मार्च या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
पालकांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे यापूर्वीच करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९ व २०२० याकरिता शिक्षणहक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांसाठी ५ मार्चपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सु डिग्री झाली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही शिक्षणहक्कची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव असलेल्या ५७६४ जागांमध्ये पूर्व प्राथमिकच्या (नर्सरी) १२१ जागांचा समावेश आहे़ यात बागलाण तालुक्यात २८, दिंडोरी तालुक्यात ३४ व नाशिक मनपा क्षेत्रात ३९ जागा उपलब्ध आहेत़ तर, पहिलीसाठी जिल्ह्यात ५६४३ जागा उपलब्ध आहे़ या जागांवर ५ मार्चपासून प्रवेशप्रक्रिया सु डिग्री झाली असून आतापर्यंत ६७२८ विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज आरटीईच्या संकेतस्थळावर दाखल झाले आहेत़
जिल्ह्यात आतापर्यंत ६७२८ अर्ज
आरटीई प्रवेशप्रक्रियेत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६७२८ अर्ज दाखल झाले आहेत़ यात ६७२१ अर्ज ऑनलाइन पद्धतीन,े तर ७ अर्ज मोबाइल अ‍ॅपवरून दाखल करण्यात आले आहे़ नाशिक जिल्ह्यात ४५७ शाळांमध्ये ५,७६४ जागांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे़ यात नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात १९ शाळांमध्ये २२१, तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ९२ शाळांमध्ये १८२१ जागांवर आरटीईअंतर्गत प्रवेश होणार आहे़

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh