Breaking news
23-07-2018 : 12:08:51

काँग्रेसकडून निवडणुकीचे बिगूल ; राहुल गांधींकडे महाआघाडीचे सर्वाधिकार

23-07-2018 : 12:07:44

पंढरपुरात जाधव दाम्पत्याकडून पूजा; मुख्यमंत्र्यांची मुंबईत विठ्ठलपूजा

22-07-2018 : 11:12:18

शंभर गिरीप्रेमींची कळसूबाई शिखरावर चढाई

22-07-2018 : 11:07:46

नितीश कुमारांचं दलितांना पदोन्नतीत आरक्षण

22-07-2018 : 10:59:29

तिरस्काराला प्रेम आणि आपुलकी हेच उत्तर- राहुल गांधी

22-07-2018 : 10:56:08

जीएसटी: १०० वस्तू स्वस्त, "या" वस्तू करमुक्त

21-07-2018 : 11:00:07

आषाढी यात्रेसाठी धावणार १९० जादा बसगाड्या

21-07-2018 : 10:59:40

हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार

17-07-2018 : 10:30:17

महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

17-07-2018 : 10:29:51

शिवरायांच्या आजोबांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्कमध्ये

13-07-2018 : 05:53:28

डेकोरेटर्सना धक्का; थर्माकोल बंदीवर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब

12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

महाविद्यालय विद्यार्थ्यांना लोकपालांकडे दाद मागता येणार

Image

मुंबई प्रतिनिधी - प्रवेश प्रक्रियेतील घोळ ते निकाल लांबणे, विद्यापीठ किंवा महाविद्यालयाकडून कागदपत्रे अडवणे अशा अनेक तक्रारींबाबत आता विद्यार्थ्यांना लोकपालाकडे दाद मागता येणार आहे. विद्यार्थी तक्रार निवारणाबाबत शासनाने परिनियम जाहीर केले असून त्यानुसार प्रत्येक विद्यापीठाला लोकपाल नेमणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे वेळेवर निराकरण व्हावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने तक्रार निवारणाची यंत्रणा २०१२ मध्ये सु डिग्री केली. या नियमावलीत सुधारणा करून त्यावर आयोगाने सूचना मागवल्या आहेत. त्याअनुषंगाने राज्य शासनानेही विद्यार्थी तक्रार निवारणाबाबत परिनियम जाहीर केले आहेत. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

या परिनियमांनुसार प्रत्येक महाविद्यालय, विद्यापीठ विभाग यांच्या स्तरावरही तक्रार निवारण समित्या स्थापणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर आयोगाच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याची सोय करण्यात आली. तेथे तक्रारीचे निवारण न झाल्यास विद्यापीठाच्या समितीकडे विद्यार्थी दाद मागू शकतील. विद्यापीठाची समिती प्र-कुलगुरू, अधिष्ठाता किंवा वरिष्ठ प्राध्यापकांच्या अध्यक्षतेखाली असेल. या समितीत नोंदणीकृत पदवीधार मतदारसंघातील सदस्यांची नियुक्ती करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या निकालाबाबत आक्षेप असल्यास लोकपालांकडे दाद मागता येणार आहे. विद्यापीठांचे माजी कुलगुरू, निवृत्त न्यायाधीश यांची लोकपाल म्हणून नियुक्ती करता येईल. विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यावर निर्णय द्यावा लागेल.

लोकपालांच्या आदेशाचे विद्यापीठाने पालन न केल्यास विद्यापीठांचा निधी थांबवणे, मान्यता काढून घेणे अशी कारवाई विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेली तरतूदही राज्याच्या नियमांमध्ये कायम ठेवण्यात आली आहे. मात्र पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, मिळालेले गुण याबाबतच्या तक्रारींवर दाद मागता येणार नाही.

संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तेथील सर्व माहिती मिळण्यासाठी छापील स्वरूपात किंवा ऑनलाईन माहिती पुस्तिका प्रकाशित करणे प्रत्येक संस्थेला बंधनकारक करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे स्वरूप, मान्यतेचे तपशील, अभ्यासक्रम, अध्यापनाचे तास, पाठय़क्रम, अध्यापकांची माहिती, त्यांची पात्रता, मान्यतेचे स्वरूप, याबाबतची माहिती, शुल्क, प्रवेश क्षमता, वयोमर्यादा किंवा पात्रता, प्रवेश परीक्षा लागू असल्यास त्याचे तपशील, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, संस्थेतील पायाभूत सुविधा, नियम यांबाबतचर माहिती विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे.

उच्च शिक्षणस्तरावरील विद्यार्थी तक्रार निवारणाची संवैधानिक व्यवस्था विद्यपीठ तसेच महाविद्यालयस्तरावर आजवर नव्हती. परंतु परिनियम प्रसिध्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रवेशापासून ते परीक्षेच्या निकालापर्यंतच्या विविध तक्रारींचे परिणामकारक निवारण होणार आहे. या परिनियमाद्वारे तक्रार निवारणाची व्यवस्था विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे विद्यपीठांना व महाविद्यालयांना बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी विद्यापीठाच्या स्तरावर लोकपाल नियुक्त करण्याची तरतूद करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

– विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh