Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

अडुळसा "रामबाण औषध"

Imageखोकला, ताप यावर अडुळसाचा रस हा रामबाण उपाय आहे. अडुळसा, ज्येष्ठमध, बेहडा, हळकुंड, फुलवलेल्या टाकणखारचे समप्रमाणातील मिश्रण मोठ्यांनी २ ग्रॅम व लहानांनी १ ग्रॅम मधासोबत आठवडाभर घेतल्यास खोकला बरा होतो. अडुळसाचा वापर केल्यास अन्य आजारातही चांगला फायदा होतो. याविषयी जाणून घेवूयात.

असा तयार करा अवलेह
एक लिटर अडुळशाच्या रसात पाव किलो साखर टाका. मंदाग्नीवर ठेवा. यास चांगली तार आल्यावर उतरून ठेवा. हा रस थोडा थंड झाल्यावर त्यामध्ये अर्धा लिटर मध व १०० ग्रॅम पिंपळी घालून सर्व मिश्रण बरणीत भरा. काही दिवसांत अवलेह मुरल्यावर औषध म्हणून वापर करा.

हे आहेत उपाय

दमा
अडुळशाच्या पानांच्या विड्या करून त्या ओढल्यास छातीतील कफ पातळ होतो.

डोकेदुखी
डोक्यावर अडुळशाच्या पानांचा लेप लावावा. याच्या पानांना शेकून रस काढला तर चांगला रस निघतो.

जखम, व्रण
अडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधावी. जखम भरून येते.

जीर्ण ज्वर
अडुळशाचा अवलेह घेल्यास चांगला फरक पडतो.

श्वास विकार
अडुळशाच्या रसात मध आणि पिंपळीचे टाकून चाटण करावे. श्वासाचा विकार बरा होतो. श्वास लागणे कमी होते.

रक्तपित्त
रक्तपित्त म्हणजे नाकातून अथवा तोंडातून रक्त येत असल्यास १० मि. लि. अडुळशाच्या रसात तितकीच खडीसाखर घालून घ्यावी. या पानांचा डोक्यावर लेप घालावा. नाकातून वाहणारे रक्त बंद होते.

प्रदरावर
प्रदरावर अडुळशाचा रस १० मि.लि. व खडीसाखर १० ग्रॅम, रोज तीन वेळा घ्यावी. अंगावरून पांढरे जाणे, अंगावरून पाणी जाणे, पाळीच्या स्रावात दुर्गंधी, अतिस्राव, कमी स्राव, गुठळ्या पडणे या समस्या दूर होतात.

देवीची साथ
अडुळशाच्या पानांचा व ज्येष्ठमधाचा काढा रोज एक वेळ मुलांना दिल्यास देवी येण्याची भीती कमी होते.

क्षयरोग
अडुळशाचे एक पान व एक लहान ज्येष्ठमधाचा तुकडा घालून पाव लिटर पाणी घालावे व अष्टमांश काढा करून घ्यावा. हा काढा क्षयरोगावर रामबाण आहे

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh