Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

आला पावसाळा आरोग्य सांभाळा

Imageनुकताच पावसाळा सु डिग्री झाला आहे. या दिवसात वातवरणात सतत बदल होत असतात. पण या वातावरणातील बदलांचा आपला त्वचेवरही परिणाम होतो. यामुळे काळजी घेणे गरजेचे असते. त्यातच पावसाळ्यात सतत भिजल्याने त्वचेवरही परिणाम होतो. साचलेल्या पाण्यातून जातानाही त्वचासंसर्ग होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात आपली त्वचेची काळजी घ्यावी लागते. आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या काही टिप्स–
वातावरणातील आद्रतेमुळे त्वचा ओलसर असते. यामुळे या दिवसात सनस्क्रीन लावणे टाळावे.
पावसाळ्यात जास्त मेकअप करणे टाळावे. वॉटरप्रुफ मेकअपचा वापर करणे उत्तम.
ब्लीच आणि फेशियल करणे टाळा कारण चेहऱ्यावरील त्वचा खरखरीत होण्याची शक्यता असते.
रात्री झोपण्यापूर्वी ओठांना दुधाची मलई लावा. गडद रंगाची लिपस्टीक वापरणे टाळा. ओठ फुटल्याचे जाणवल्यास त्यावर नारळाच्या तेलचा वापर केल्यास उत्तम.
कडुलिंबाची पाने अंघोळ करताना गरम पाण्यात टाकून आंघोळ करा. त्याने आपल्याला ताजेतवाने आणि निरोगी राहण्यास मदत होते.
केसांची काळजी कशी घ्याल ?
शरीराबरोबरच केसांची काळजी घेणे देखील महत्तवाचे आहे. त्याच संबंधी काही टिप्स –
शक्यतो आपण पावसात भिजणे टाळावे कारण त्याने आपले केस खराब होण्याची शक्यता जास्त असते.
जर केस ओले झाले असतील तर लगेच कोरडे करावे.
शॅम्पू नंतर कंडीशनर वापरावा त्याने केस सिल्की राहण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेलाचे मालिश करुन झोपावे.
केसांना कलर करणे शक्यतो टाळा कारण त्याने केस गळण्याची दाट शक्यता असते.
हर्बल शैम्पूचा वापर करणे चांगले.
केस हेअर ड्रायरणे केस सुकवणे टाळा टॉवेल ने केस कोरडे करा.

पावसाळ्यातील आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काही टिप्स–
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अनेक रोग पसरण्याची शक्यता जास्त असते. आपण खाल्लेल्या अन्नातून अनेक आजार होण्याची
शक्यता असते. आणि रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो.

चांगले आरोग्यासाठी काही टिप्स
पावसाळ्यात मुबलक पाणी पिणे गरजेचे आहे. त्याने त्वचा देखील कोरडी होत नाही.
सर्व फळे आणि भाज्या, धुवून मगच खा.
शरीर उबदार ठेवा कारण शरीरातील तापमान कमी झाल्यास व्हायरल फ्ल्यु होण्याची शक्यता आहे.
सूप आणि गरम केलेले अन्न खावे. ते आपल्या त्वचेस पोषक आहे.
लसूण, मिरपूड, आले, हळद, जिरा पावडर आणि धणे आपल्या आहारात समाविष्ट केल्याने अपचन होण्याची शक्यता कमी होते. आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
शरीराची स्वच्छता ठेवा आणि उघड्यावरचे अन्न टाळावे. त्याने आजार होण्याची शक्यता असते.
निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh