Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

रिठ्याचे औषधी गुणधर्म

Imageरिठा मूळचा द. भारतीय असून त्याचा प्रसार समुद्रकिनाऱ्यावर व डोंगरांच्या उतरणीवर खालच्या भागातील विरळ जंगलात झालेला आढळतो. तो शोभेकरिता लावतात आणि प. बंगाल, बिहार, म. प्रदेश आणि उ. प्रदेश येथील खेड्यांत त्याची लागवड करतात. याची साल करडी, चकचकीत असून तीवर खरबरीत व गळून पडणारे खवले असतात. पाने संयुक्त, एकाआड एक, समदली, पिसासारखी आणि १२−१३ सेंमी. लांब असून दलांच्या जोड्या २−३ असतात : प्रत्येक दल भाल्यासारखे, लंबगोल किंवा आयत, लांबट टोकाचे अथवा सॅ. इमार्जिनेटस प्रकारात टोकास निम्नमध्य (खाचदार) असते. या वृक्षाला लहान, नियमित, पांढरी द्विलिंगी व एकलिंगी फुले परिमंजरीवर झ्र्⟶ पुष्पबंधट ऑक्टोबर ते डिसेंबरात येतात; एकलिंगी फुले संख्येने बरीच असतात. संवर्त तांबूस, लोमश आणि प्रदले केसाळ असतात झ्र्⟶ फूलट. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे कोवळेपणी केसाळ, १श्व्३−२श्व्० व्यासाची आणि २-३ एकत्र जुळलेली असतात; पिकल्यावर ती मऊ व भुरकट होतात आणि वाळल्यावर आतील मगज सालीशी एकरूप होईन ती साल कडक व सुरकुतलेल्या दिसते. बिया २−३, काळपट, कठीण व वाटाण्याएवढा असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨सॅपिडेसी कुलात (अरिष्ट कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

रिठ्याची लागवड बिया, फुडवे अथवा मुनवे लावून करतात. रिठा बागेत शोभेकरिताही लावतात. याच्या प्रजातीचे सॅपिंडस हे नाव साबण व भारतीय (इंडियन) या अर्थाच्या लॅटिन शब्दांवरून आले आहे कारण भारतात याचा साबणाप्रमाणे उपयोग करतात. लॉरिफोलियस हे जातिवाचक नाव याची पाने लॉरेलच्या पानांसारखी असल्याने आले आहे. सॅ. मकेरोसी जातीचा प्रसार उत्तम भारतात व आसामात १,५०० मी. उंचीपर्यंत झाला आहे. इतर भागात त्याची फळांसाठी लागवड केलेली आढळते.

रिठ्यांचा म्हणजे फळांचा उपयोग मुख्यतः मलशुद्धीकरिता होतो कारण त्यात सॅपोनीन हे द्रव्य असते. अशा प्रकारे रेशमी, लोकरी व इतर प्रकारचे तलम कापड धुण्यासाठी तसेच सोने, मोती, हिरे व केस स्वच्छ करण्यासाठी रिठे वापरतात. याचे लाकूड जड व कठीण असून ते गाड्या व इतर किरकोळ वस्तूंसाठी वापरतात. मूळ व साल कफोत्सारक (कफ पाडून टाकणारी), बियांचे तेल औषधी तर फूल पौष्टिक, विषबाधा कमी करणारे, स्तंभक (आकुंचन करणारे), ओकारी आणणारे, रेचक व भोवळ आणणारे असून त्याची पूड तपकिरीप्रमाणे ओढल्यास दमा, उन्माद, अर्धशिशी इत्यादींवर गुणकारी ठरते

अंगाचा दाह होत असल्यास रिठ्याचा फेस अंगाला चोळल्याने आराम वाटतो.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh