Breaking news
23-07-2018 : 12:08:51

काँग्रेसकडून निवडणुकीचे बिगूल ; राहुल गांधींकडे महाआघाडीचे सर्वाधिकार

23-07-2018 : 12:07:44

पंढरपुरात जाधव दाम्पत्याकडून पूजा; मुख्यमंत्र्यांची मुंबईत विठ्ठलपूजा

22-07-2018 : 11:12:18

शंभर गिरीप्रेमींची कळसूबाई शिखरावर चढाई

22-07-2018 : 11:07:46

नितीश कुमारांचं दलितांना पदोन्नतीत आरक्षण

22-07-2018 : 10:59:29

तिरस्काराला प्रेम आणि आपुलकी हेच उत्तर- राहुल गांधी

22-07-2018 : 10:56:08

जीएसटी: १०० वस्तू स्वस्त, "या" वस्तू करमुक्त

21-07-2018 : 11:00:07

आषाढी यात्रेसाठी धावणार १९० जादा बसगाड्या

21-07-2018 : 10:59:40

हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार

17-07-2018 : 10:30:17

महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

17-07-2018 : 10:29:51

शिवरायांच्या आजोबांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्कमध्ये

13-07-2018 : 05:53:28

डेकोरेटर्सना धक्का; थर्माकोल बंदीवर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब

12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

काळी वर्तुळे

Image


डोळ्याखालील काळी वर्तुळे कोणाच्याही सौंदर्यात बाधा आणतात. पण डोळ्याखाली ही वर्तुळे अपुऱ्या झोपेमुळेच होतात असे नाही. तर प्रदूषण, धूम्रपान, सकस आहाराची कमी किंवा इतर कारणांमुळेदेखील डोळ्याखाली वर्तुळे होऊ शकतात. ती घालवण्यासाठी जाणून घेऊया काही घरगुती उपचार.

दूध

दूध त्वचेला मऊ ठेवण्यास मदत करते. यामध्ये लॅक्टिक ऑसिड असते. डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि सूज कमी करण्यासाठी दूध गुणकारी मानले जाते. यासाठी थंड दुधामध्ये कापसाचे बोळे भिजत ठेवा आणि यांना डोळ्याच्या खाली ठेवा. पंधरा मिनिटे ते बोळे डोळ्यावर राहू द्या. हा उपाय जेवढा जास्त कराल तेवढा लवकर डोळ्याखालील काळे वर्तुळ दूर होतील.

काकडीचे स्लाइस (तुकडे)

काकडीमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्याने ती आरोग्यासाठी चांगली असते. काकडी अर्धा तास प्रीजमध्ये ठेवून नंतर त्या काकडीच्या गोल चकत्या करून डोळ्यावर ठेवाव्यात. वीस मिनिटे डोळ्यांवर तसेच ठेवावे. काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर डोळ्याच्या खालील सूजदेखील कमी होते.

गुलाब जल

अनेक नैसर्गिक गुण असलेले गुलाब जल परिणामकारक आणि थंडावा देण्याचे काम करते. दोन मोठे चमचे गुलाब जलात काही मिनिट कापसाचे बोळे भिजत ठेवा. नंतर डोळे बंद करून भिजलेले कापसाचे बोळे डोळ्यावर ठेवा. पंधरा मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या उपायाने डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होतील.

ग्रीन टी बॅग

ग्रीन टी बॅग डोळ्याखालील काळे वर्तुळ कमी करण्यासाठी मदत क डिग्री शकतात. कारण यामध्ये असलेले गुण डोळे ताजेतवाने करतात आणि काळी वर्तुळे दूर करण्यास मदत करतात. केवळ दोन ग्रीन टी बॅगची गरज आहे. टी-बॅग पाण्यात बुडवा आणि 30 मिनिट प्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर थंड टी बॅग आपल्या डोळ्यावर ठेवा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर आपल्या डोळ्यांना साध्या पाण्याने धुवा. हा उपाय दिवसातून एकदा क डिग्री शकता.

कोरफड जेल

कोरफडीची जेल त्वचेतील ओलावा राखण्यासाठी आणि पोषण देण्यासाठी प्रभावी आहे. कोरफडीचे ताजे पान घेऊन त्यातला गर काढा. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या एलोवेरा जेलचाही वापर तुम्ही क डिग्री शकाल. डोळ्याखाली कोरफडीचा गर लावा आणि हळूहळू मालिश करा. यानंतर 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. 10 मिनिटानंतर यास कापसाच्या मदतीने स्वच्छ करा.

मध

मध त्वचेला पोषण देण्यासोबतच त्वचा कोमल बनवते. डोळ्याच्या खाली मध लावा आणि वीस मिनिटे तसेच ठेवा. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि कोरडे होऊ द्या. दररोज हा उपाय दोन वेळा क डिग्री शकता.

लिंबाचा रस

लिंबाचा रस हा मृत त्वचा काढण्यासाठी आणि त्वचा तजेलदार करण्यासाठी मदत करते. कापसाच्या मदतीने डोळ्याखाली लिंबाचा रस लावून दहा मिनिटे तसाच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने धुऊन घ्या. हा उपाय दिवसातून दोनवेळा क डिग्री शकता. सकाळी आणि रात्री क डिग्री शकता.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh