Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

पाच मराठी चित्रपटांची वर्णी इफ्फी महोत्सवात दिसणार

Image


मुंबई प्रतिनधी - भारतातील नामांकित चित्रपट महोत्सव म्हणून ओळख असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा गोव्यात रंगणार आहे. १९५२ साली सु डिग्री झालेला या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वं वर्ष असून यात वेगवेगळ्या देशांमधील २०० पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. अभिनेते अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाहेब फाळके जाहीर झाला आहे, त्यामुळं अमिताभ बच्चन यांचे दर्जेदार चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी ५ मराठी चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.

हा महोत्सव २० नोव्हेंबरपासून २८ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या महोत्सवात यावेळी विविध प्रादेशिक भाषांमधील २६ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी महोत्सवामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांबरोबरच प्रादेशिक भाषांतील २६ चित्रपटांचाही समावेश आहे. तसंच, १५ नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. ५०वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.

या पाच मराठी चित्रपटांची वर्णी

सुजय डहाके दिग्दर्शित "तुझ्या आयला ", समीर विद्वांस दिग्दर्शित "आनंदी गोपाळ ", शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित "भोंगा", अनंत महादेवन दिग्दर्शित "माई घाट : क्राईम नंबर १०३प्र्२००५ , आदित्य राही आणि गायश्री पाटील दिग्दर्शित "फोटो प्रेम " या मराठी चित्रपटांचा समावेश आहे ५० व्या इफ्फी महोत्सवात करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या ४९ व्या "इफ्फी" आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये "इंडियन पॅनारोमा फीचर फिल्म" विभागात २२ चित्रपटांपैकी केवळ २ आणि २१ नॉन फीचर फिल्मपैकी ८ मराठी लघुपटांची निवड करण्यात आली होती.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh