Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

रश्‍मि रॉकेट" सिनेमात तापसी पन्नू बनणार "धावपटू"

Image



नवी दिल्ली वृत्तसंस्था - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा मोठ्या खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. "बेबी", नाम शबाना यांसारख्या सिनेमांत ऍक्शन केल्यानंतर तिने सुरमा मध्ये एका हॉकी खेळाडूची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता नवीन सिनेमात ती धावपटू बनणार आहे. "रश्‍मि रॉकेट असे तिच्या नवीन सिनेमाचे नाव असून या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले असून तापसी पन्नू हिने कालपासून चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. गुजरातमधील धावपटू रश्मी हिच्या जीवनावर आधारित आहे.या सिनेमाच्या पोस्टरमध्ये तापसी कच्छ मधील रेसिंग ट्रॅकवर धावताना दिसून येत आहे. मात्र तापसी केवळ याच सिनेमात खेळाडूच्या भूमिकेत नजर येणार नसून ती आपल्या पुढील सिनेमात देखील खेळाडूच्या भूमिकेत समोर येणार आहे. "सांड की आंख" असे या सिनेमाचे नाव असून तिच्या भूमिकेबद्दल अद्याप जास्त माहिती मिळालेली नाही. मात्र मिशन मंगल नंतर तापसीला अनेक सिनेमांच्या ऑफर मिळत असून बॉलिवूडमध्ये तिचा भाव देखील वाढला आहे.
दरम्यान, तापसी पन्नू हिच्या मिशन मंगल या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता या दोन सिनेमांना देखील असेच यश मिळो अशी प्रार्थना सध्या तापसी पन्नू करत आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh