Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

आर्यनची बाबा’ चित्रपटात आगळीवेगळी भूमिका

Image

मुंबई : अभिनेता संजय दत्तची पहिलीच मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच बालकलाकार आर्यन मेंघजी मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे.


गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक अशा भूमिकांसाठी प्रत्येक कलाकार हा खूप मेहनत घेत असतो. बालकलाकार आर्यन मेंघजीही त्याला अपवाद नाही. तो ‘बाबा’ चित्रपटात प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. त्याच्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक होती, ती त्याने पडद्यावर त्याच ताकदीने साकारली आहे. आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच ‘भावनेला भाषा नसते’, हा सरळसाधा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात चित्रित झालेला हा चित्रपट पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.

आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करताना आर्यननेही स्वतःची प्रतिभा सिद्ध केली आहे. तो म्हणतो की, या चित्रपटाबद्दल त्याला खूप उत्कंठा लागून राहिली आहे. या चित्रपटाबद्दलच्या तयारीबद्दल बोलताना तो म्हणतो, या चित्रपटात काम करताना मला खुप मज्जा आली. मी यामध्ये शंकर नावाचं पात्र साकारलं आहे. चित्रपटातील माझी भूमिका खूपच आव्हानात्मक होती. ती साकारताना मला खूप मजा आली. तो पुढे म्हणाला की ‘या चित्रपटासाठी काम सुरु करण्याआधी मी ‘१५ ऑगस्ट’ केला. तो डिजिटली प्रदर्शित झाला होता. मोठ्या पडद्यावर प्रत्यक्ष प्रदर्शित होणारा ‘बाबा’ हा माझा पहिला चित्रपट असून त्याचमुळे या चित्रपटाबद्दल मला खूप उत्सुकता आहे.

अवघ्या नऊ वर्षांच्या आर्यनने गणपती बाप्पा मोरया, कुलस्वामिनी या मराठी आणि अशा अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी आपण खूप धमाल केल्याचे आर्यन सांगतो. ‘आम्ही खूप मेहनत घेतली आणि खूप धमालही केली. दोन दृश्यांच्या चित्रीकरण्या दरम्यान आम्ही सेटवर क्रिकेट खेळायचो’ असे तो म्हणतो. ‘बाबा’मध्ये ‘तनु वेडस मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्याबरोबर नंदिता पाटकर प्रमुख भूमिकेत आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh