Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

स्वराज्यजननी जिजामाता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Image

मुंबई प्रतिनिधी - सध्या छोट्या पडद्यावर अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या चरित्रपटांची मालिका झळकताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी अमोल कोल्हे यांनी साकारलेली ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या बड्या हस्तींच्या आयुष्यावर मालिका सुरु आहेत. पण आता, भोसले कुटुंबात आपल्या पोटी एका राजाला जन्म देणाऱ्या स्वराज्य जननी जिजामाता यांच्या चरित्रपटावरील मालिका लवकरच सुरु होणार आहे.

मध्यंतरी या मालिकेत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत काम करणार असल्याचे कळत होते, पण आता अमृता पवार ही अभिनेत्री या मालिकेत जिजामाता यांचे व्यक्तिमत्व साकारणार असल्याचे समोर आले आहे. या आधी अमृता पवार ही अभिनेत्री स्टार प्रवाहवरील ‘दुहेरी’ तसेच ‘ललित २०५’ या मालिकांमध्ये झळकली होती. दरम्यान ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेचा टिझर नुकताच लॉन्च झाला असून याचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेचा टिझर पाहता कळते की कितीही संकटं आली तरी जिजामाता कधी मागे फिरल्या नाहीत. संकटांना न घाबरता पुढे कसं जावं हे त्यांनी शिवबांना लहानपणापासूनच शिकवले. त्यांचे चरित्रपट पाहणे म्हणजे नक्कीच एक पर्वणी असेल. या आधी छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक मालिका, चित्रपट, नाटक निघाले. त्यात दाखवल्या जाणाऱ्या त्यांच्या माऊली म्हणजे जिजामाता यांचे व्यक्तिमत्व अनेक वेगवेगळ्या अभिनेत्रींनी साकारली. उदाहरण द्यायचे झाले तर मृणाल कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर यांनी त्यांची भूमिका सुंदररित्या साकारली. पण आता अमृता पवार जिजामातांची भूमिका कशी साकारेल ही नक्कीच पाहण्यासारखी गोष्ट ठरेल.

‘शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरी’, असे म्हणतात. पण त्या काळात आपल्या पोटात नऊ महिने सांभाळून ठेवणाऱ्या आणि शत्रूंशी दोन हात कसे करावे हे शिकवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची मालिका पाहायला प्रेक्षकवर्ग नक्कीच उत्सुक असणार यात काही शंका नाही. राजमाता जिजाऊंवरील हि मालिका येत्या १९ ऑगस्टपासून सोनी मराठी या वाहिनीवर येणार आहे.



Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh