Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

तेजश्री ची नवी मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Image



मुंबई प्रतिनिधी : ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘झी मराठी’वरील आगामी ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून तेजश्री छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफही झळकणार आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून यामध्ये तेजश्रीच्या सासूबाई म्हणजेच निवेदीता यांचे लग्न होत असतानाचे दृश्य दाखवण्यात आले आहे. यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून तेजश्री ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. इतकंच नव्हे तर ती महाराष्ट्राची लाडकी व आदर्श सून बनली. त्यानंतर तेजश्रीने चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला. पण आता तेजश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळणार आहे.

‘अग्गंबाई सासूबाई’ या आगामी मालिकेत तेजश्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दिग्गज कलाकारांचा मेळ असलेली ही मालिका नक्कीच रंजक असेल यात शंकाच नाही. हि मालिका २२ जुलै पासून रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याचाच अर्थ ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh