Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

सागरिका घाडगे पुन्हा एकदा स्पोर्ट्सवुमनच्या रुपात रुपेरी पडद्यावर अवतरणार

Image



मुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री सागरिका घाडगे पुन्हा एकदा स्पोर्ट्सवुमनच्या रुपात रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. "चक दे इंडिया" या पदार्पणाच्या चित्रपटात सागरिकाने हॉकीपटूची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सागरिकाने साकारलेली भूमिका रसिकांना भावली होती. आता मिलिंद उके दिग्दर्शित मान्सून फुटबॉल या मराठी चित्रपटातून सागरिका रसिकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच सागरिकाने मान्सून फुटबॉल या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. "मान्सून फुटबॉल " हा स्त्रीप्रधान चित्रपट आहे. यातील प्रत्येक महिला जिद्दीच्या जोरावर आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. त्यामुळेच सागरिकानेही या महिला शक्ती सेलिब्रेट करूया आणि महिला फुटबॉल विश्वचषक २०१९मधील संघाना चीअर करूया तसंच त्यांना खेळताना पाहूया असं या पोस्टरसह सागरिकाने लिहिलं आहे. या पोस्टरमध्ये सागरिका फुटबॉलच्या मैदानात उभी आहे. तिने पोपटी रंगाची साडी परिधान केली असून तिने स्पोर्ट्स शूज घातले आहेत. मान्सून फुटबॉल ही संसार करणाऱ्या महिलांची कथा असून फुटबॉल टीम तयार करण्यासाठी त्या एकत्र येतात. हा चित्रपट डिसेंबर २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. सागरिकाचा हा दुसरा मराठी चित्रपट असून प्रेमाची गोष्ट हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता. यांत ती अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्यासह ती रुपेरी पडद्यावर झळकली होती.

मान्सून फुटबॉलमध्ये या चित्रपटात सागरिका घाटगे ,विद्या माळवदे , चित्राशी रावत आणि सीमा आझमी यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. "मान्सून फुटबॉल"चित्रपटात या सर्व अभिनेत्री साडी नेसून आणि स्पोर्ट्स शूज घालून फुटबॉल खेळताना दिसणार आहेत. मध्यमवर्गीय गृहिणी या त्यांच्या नेहमीच्या जीवनशैलीतील गोष्टींना कंटाळलेल्या असतात आणि फुटबॉल ही त्यांची पॅशन असते. या सर्व महिला एकत्र येऊन त्यांच्या आयुष्यातील कंटाळवाणेपण कसे दूर करतात आणि फुटबॉल खेळण्याच्या जिद्दीला कशा पूर्णत्वाला नेतात याचे चित्रण या चित्रपटात आहे .

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh