Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

श्री गुरूदेव दत्त’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Image



मुंबई प्रतिनिधी : मराठी असो वा हिंदी सध्या प्रत्येक वाहिनीवर पौराणिक मालिकांचा ट्रेण्ड पाहायला मिळतोय. ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणखी एक पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दत्तगुरूंचा महिमा सांगणास्या या मालिकेचे शीर्षक ‘श्री गुरुदेव दत्त’ असे असेल. १७ जूनपासून सायं. ७.३० वा. ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

दत्तगुरूंचा जन्म कसा झाला? त्यांचे बालपण आणि माता अनसूयासोबतचे त्यांचे नाते मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे पुराणांमध्ये दत्तगुरूंचे वर्णन केले जाते. दत्तगुरूंच्या अवताराची ही गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव नक्कीच असेल.

या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतक्या महान अवताराची कथा सांगताना गर्व, अभिमान आणि आनंद वाटतोय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा मिळून एक अवतार जन्मला तो म्हणजे दत्तगुरू. दत्तगुरूंच्या अवताराची जन्मापासूनची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळले. अत्री ऋषी आणि माता अनसूयेच्या पोटी जन्माला येण्यापासून ते अगदी आजही त्यांच्या महात्म्याची वेळोवेळी प्रचिती देणारी अद्भुत कथा सादर करण्याचा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा प्रयत्न असेल. आध्यात्म, सत्य आणि अप्रतिम व्हिज्युअल इफेक्टस याची उत्तम सांगड या मालिकेत दिसेल. अभिनेता, दिग्दर्शक दीपक देऊळकर यांनी मालिकेची निर्मिती केली असून दिग्दर्शक अनिल राऊत यांच्यासह ते दिग्दर्शनही करणार आहेत. लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे आहे. पौराणिक काळ जिवंत करणारा भव्यदिव्य सेट या मालिकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh