Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

अमृत गायकवाड साकारतोय बालपणीच्या आंबेडकरांची भूमिका

Image



मुंबई प्रतिनिधी - स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत बालपणीच्या आंबेडकरांची भूमिका साकारतो आहे बालकलाकार अमृत गायकवाड. छोट्या अमृतचं सध्या सगळीकडेच कौतुक होतंय. अमृत मूळचा नाशिकजवळच्या घोटी गावातला. फावल्या वेळात गाणी ऐकणं हा त्याचा आवडता छंद. मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन सुरु होती तेव्हा अमृतला त्याबद्दल कळलं आणि त्याने थेट ऑडिशनचं ठिकाण गाठलं.

अमृतचा उत्साह आणि हजरजबाबीपणा भाव खाऊन गेला आणि अमृतची बालपणीच्या आंबेडकरांच्या भूमिकेसाठी निवड झाली. अमृत सेटवर सर्वांचाच लाडका आहे. दिग्दर्शक अजय मयेकरांच्या सूचनांचं तो काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळेच सीन अधिकाधिक खुलून येतात. मालिकेत अमृतच्या मोठ्या भावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आनंदासोबत त्याचं नातं अधिक घट्ट आहे. आनंदाशिवाय एक क्षणही तो राहत नाही. हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचं शीर्षकगीतही अमृतने तोंडपाठ केलं आहे. सेटवर सतत तो हे शीर्षकगीत गुणगुणत असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. अभिनयाचं वेड असलेल्या अमृतला याच क्षेत्रात करिअर करायचं आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका त्याच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh