Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

हाफ तिकीट’ चीनमध्ये प्रदर्शित होणार

Image



मुंबई : लहानग्यांच्या भावविश्वाचा कॅनव्हास रेखाटणाऱ्या समित कक्कड दिग्दर्शित ‘हाफ तिकीट’ या मराठी चित्रपटाने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव मोठ्या दिमाखात कोरलं. आता आणखी एक मानाचा तुरा या चित्रपटाच्या शिरपेचात रोवला गेला आहे. हा चित्रपट लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चीनमध्ये प्रदर्शित होणारा ‘हाफ तिकीट’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला हे विशेष. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. हा चित्रपट मराठीतच पाहता येणार असून त्याला चिनी सबटायटल्सची जोड असणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दाक्षिणात्य चित्रपट ‘काक मुत्ताई’चा मराठी रिमेक असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला असंख्य चित्रपट महोत्सवांमधून केवळ नावाजलेच गेले नाही तर अनेक पुरस्कारही मिळाले. दोन भावांच्या जिद्दीची त्यांच्या संघर्षाची ही गोष्ट क्षणिक भौतिक सुखांचा मागोवा घेते. शुभम मोरे, विनायक पोतदार या दोन बालकलाकारांच्या सहज-सुंदर अभिनयाला भाऊ कदम, प्रियांका बोस, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर , कैलाश वाघमारे आदि दिग्ग्ज कलाकारांची उत्तम साथ लाभली आहे.

हा चित्रपट पुढील एक-दोन महिन्यात चीनमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज असून या चित्रपटाच्या निमित्ताने चीनसारखी मोठी बाजारपेठ आता मराठी चित्रपटांसाठीसुद्धा खुली झाली आहे हे सांगण्यास मला आनंद होत आहे, असं निर्माते नानूभाई जयसिंघानी यांनी सांगितले तर माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी हा सुवर्णक्षण असून मराठी चित्रपट आज जागतिक स्तरांपर्यंत पोहोचत असल्याचं पाहून मला खूप आनंद होत आहे, असं दिग्दर्शक समित कक्कड यांनी सांगितलं.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh