Breaking news
23-07-2018 : 12:08:51

काँग्रेसकडून निवडणुकीचे बिगूल ; राहुल गांधींकडे महाआघाडीचे सर्वाधिकार

23-07-2018 : 12:07:44

पंढरपुरात जाधव दाम्पत्याकडून पूजा; मुख्यमंत्र्यांची मुंबईत विठ्ठलपूजा

22-07-2018 : 11:12:18

शंभर गिरीप्रेमींची कळसूबाई शिखरावर चढाई

22-07-2018 : 11:07:46

नितीश कुमारांचं दलितांना पदोन्नतीत आरक्षण

22-07-2018 : 10:59:29

तिरस्काराला प्रेम आणि आपुलकी हेच उत्तर- राहुल गांधी

22-07-2018 : 10:56:08

जीएसटी: १०० वस्तू स्वस्त, "या" वस्तू करमुक्त

21-07-2018 : 11:00:07

आषाढी यात्रेसाठी धावणार १९० जादा बसगाड्या

21-07-2018 : 10:59:40

हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार

17-07-2018 : 10:30:17

महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

17-07-2018 : 10:29:51

शिवरायांच्या आजोबांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्कमध्ये

13-07-2018 : 05:53:28

डेकोरेटर्सना धक्का; थर्माकोल बंदीवर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब

12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

रिंकू राजगुरूच्या कागरचा टीझर रिलीज

Image


मुंबई प्रतिनिधी -

सैराट" चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगु डिग्री तब्बल दोन वर्षाच्या ब्रेकनंतर लवकरच "कागर" चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्पावधीत या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या "उदाहरणार्थ" या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचे दिग्दर्शन केले आहे.

"कागर" चित्रपटाच्या टीझरमध्ये पुन्हा एकदा रिंकूचा सैराटमधील आर्चीचा बोलण्याचा बाज पाहायला मिळतो आहे. या टीझर पाहिल्यानंतर यातही प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. मात्र राजकारणाला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा गुंफण्यात आल्याचे जाणवते. तसेच तिच्या प्रियकराला मारहाण होते आणि रिंकू राजकारणात एन्ट्री करते, असे दाखवण्यात आले आहे. तिची प्रेमकथा पूर्ण होते की अपूर्ण राहते, हे चित्रपटातच समजेल.

कागर"चा टीझर पाहिल्यानंतर रिंकूला एका वेगळ्या अंदाजात पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या "उदाहरणार्थ" या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे.राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. वडील-मुलाच्या नात्यावर आधारित रिंगण आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला यंग्राड हे दोन चित्रपट मकरंदने या पूर्वी दिग्दर्शित केले होते. रिंगण आणि यंग्राड हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते. त्यामुळे आता कागर या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मुळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

या चित्रपटाचे चित्रीकरण तिच्याच अकलूजमध्ये करण्यात आले आहे. कागर चित्रपट २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh