Breaking news
23-07-2018 : 12:08:51

काँग्रेसकडून निवडणुकीचे बिगूल ; राहुल गांधींकडे महाआघाडीचे सर्वाधिकार

23-07-2018 : 12:07:44

पंढरपुरात जाधव दाम्पत्याकडून पूजा; मुख्यमंत्र्यांची मुंबईत विठ्ठलपूजा

22-07-2018 : 11:12:18

शंभर गिरीप्रेमींची कळसूबाई शिखरावर चढाई

22-07-2018 : 11:07:46

नितीश कुमारांचं दलितांना पदोन्नतीत आरक्षण

22-07-2018 : 10:59:29

तिरस्काराला प्रेम आणि आपुलकी हेच उत्तर- राहुल गांधी

22-07-2018 : 10:56:08

जीएसटी: १०० वस्तू स्वस्त, "या" वस्तू करमुक्त

21-07-2018 : 11:00:07

आषाढी यात्रेसाठी धावणार १९० जादा बसगाड्या

21-07-2018 : 10:59:40

हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार

17-07-2018 : 10:30:17

महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

17-07-2018 : 10:29:51

शिवरायांच्या आजोबांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्कमध्ये

13-07-2018 : 05:53:28

डेकोरेटर्सना धक्का; थर्माकोल बंदीवर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब

12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘मोलकरीण बाई’

Image


मुंबई प्रतिनिधी -

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई आजच्या नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. कधी ताई, कधी मावशी, कधी काकू तर कधी नुसतीच बाई, अशी ओळख असलेली व्यक्ती कुटुंबातील सदस्य नसली तरी त्याचाच एक अविभाज्य भाग. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी ‘मोलकरीण बाई’ मालिका लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

घरकाम करणा-या बाईचे तिच्या मालकिणींसोबत असणारे हृदयस्पर्शी नाते या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. आयुष्य हे संघर्ष आणि व्यथांनी भरलेले असलं तरी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा अनमोल संदेश त्या देतात. या मालिकेविषयी ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘मोलकरीण बाई’ मालिकेतून खूप महत्त्वाचा विषय हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. घरकाम करणारी बाई ही प्रत्येकाच्या आयुष्यातली खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. म्हणूनच तर त्यांना आपण ‘सपोर्ट सिस्टीम’ म्हणतो. याच मंडळींच्या आयुष्यात डोकावणारी ही मालिका आहे.’’

‘मोलकरीण बाई’ मालिकेत उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. सर्वोत्कृष्ट कथा आणि या सर्वाचा हृदयस्पर्शी अभिनय असलेली ही मालिका १८ मार्चपासून सायंकाळी ६.३० वा. स्टार प्रवाहवर प्रसारित होत आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh